मुंबई
संजय राऊत यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे. राम मंदिराचा उद्घाटन सोहळा हा भाजपाचा इव्हेंट आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच त्यात पावित्र्य कुठे आहे? असा सवाल उपस्थित केल्यानंतर भाजपकडून चित्रा वाघ आणि नितेश राणे यांनी राऊतांवर बोचरी टीका केली आहे.
राऊतांच्या या टीकेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, सर्वज्ञानी संजय राऊत जी देशातल्या प्रत्येक हिंदू धर्माभिमानी आणि श्रीरामप्रेमी भारतीयाला रामलल्ला मंदिर लोकार्पणाचे निमंत्रण आहे…लोकार्पणापूर्वीच रोज शेकडो भाविक मंदिराचे रुप डोळ्यात साठवून घेण्यासाठी अयोध्येकडे प्रस्थान ठेवताहेत असे असताना तुम्ही मात्र हा फक्त भाजपचा कार्यक्रम असल्याचे म्हणताय. फक्त भाजपचा कार्यक्रम असता तर फक्त भाजपचे कार्यकर्ते आले असते; इथं तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण हजेरी लावताहेत. रामनामाच्या ओढीने लोक पक्ष-जात-वर्ग-धर्मभेद विसरून अयोध्येकडे धाव घेताहेत, हे तुमच्या रोजच्या बेताल बडबडीमागचं खरं कारण आहे. दरम्यान आपल्या पत्रकार परिषदेतून नेहमीप्रमाणे नितेश राणे यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला.
काय म्हणाले नितेश राणे…
- आमंत्रणावर आम्ही राजकारण केले नसल्याचे राऊत म्हणाला,राऊतचा गजनी झाला आहे.
- यापूर्वी मेट्रो, बाळासाहेब स्मारक भूमिपूजनवेळी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री असताना का डावललं?
- राम मंदिर कार्यक्रमाला बोलवलं नाही म्हणून हे थयथयाट करत आहेत.
- सिद्धिविनायक ट्रस्टवर भावोजीला बसवलं होत तेव्हा त्याचा सातबारा आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न केला होता का?
- कोरोना काळात उद्धव ठाकरे व पाटणकर यांच्यासाठी VIP दर्शन कसं सुरू होतं.
- उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना वर्षा बंगल्यावर गणपती पूजेसाठी सिद्धिविनायक मंदिरातील पुजारी 11 दिवस होते.
- कोणाला तिथे बोलवाव हे राम देवतेने ठरविले आहे. तुमच्या सारख्या पापी लोकांना बोलवलं नाही.
- राहुल गांधीचा पुन्हा एकदा फ्लॉप शो. सुरू होतोय.
- मणिपूर ते मुंबई भागात काँग्रेसचा पराभव निश्चित आहे.
- संजय राऊतचा घाम कुठे कुठे गळतो हे गोरेगाव रॉयल फार्म वर समजेल. उद्धव ठाकरेचा घाम कधी गळतो हा संशोधनाचा विषय आहे.
- किडनॅप…अशी खालच्या दर्जाची भाषा राऊत करत आहे. आमच्या देवाला कोणीही किडनॅप करू शकत नाही.
- 500 वर्षा पासून असलेली इच्छा पूर्ण झाली आहे. हे याच्या सारख्या मुल्लाला कळणार नाही.
- दुसऱ्यांच्या उद्योग समूहावर बोलण्यापेक्षा पाटणकर बाबत संजय राऊतने एक अग्रलेख लिहावा.
- सिद्धिविनायक बाप्पाचा सातबारा आदेश बांदेकरच्या निमित्ताने स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला होता त्यावर बोल.
- तुम्ही पण काचेच्या घरात राहता याचा विचार करा.