मुंबई
२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. केंद्राकडून याची भव्य तयारी सुरू आहे. दरम्यान भाजप प्रवक्ता आणि आमदार राम कदम यांनी पंतप्रधान एकनाथ शिंदे यांना विनंती करणार पत्र पाठवलं आहे.
राम कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या सोहळ्यानिमित्ताने महाराष्ट्रातील दारूची दुकानं आणि चिकन-मटणची दुकानं बंद ठेवावी, अशी विनंती केली आहे. याशिवाय राज्य सरकारने केंद्राला विनंती करून त्यादिवशी संपूर्ण देशभरात त्या दिवशी दारू बंदी करण्याची विनंती करावी अशी मागणी केली आहे. अद्याप या मागणी पत्रावर मुख्यमंत्र्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
काय म्हणाले राम कदम…
अयोध्येत होणाऱ्या २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या पवित्र दिवसाचे महत्व लक्षात घेता त्यादिवशी महाराष्ट्रात दारू आणि मासबंदी व्हावी याबाबत…. तसेच महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला विनंती करून त्यादिवशी संपूर्ण देशभर देखील त्या दिवसासाठी दारू बंदी करण्याची विनंती करावी.. ही करोडो रामभक्तांची आपणास विनंती आहे.