मुंबई
आयकर विभागातील १२०० पैकी केवळ ३ पदे मराठी तरुणांना मिळाली आहेत. केंद्राला महाराष्ट्रात उत्तर भारतीयांची कार्यालयं थाटायची आहेत का, असा सवाल शिवसेनेने केंद्राला केला आहे.
शासकीय नोकरी महाराष्ट्रात पण त्यात एक टक्काही मराठी तरुणांना संधी नसल्याचं उघड झाल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. या प्रकरणात रेल्वे महामंडळाला पत्र लिहून सावंत यांनी जाब विचारला आहे. शासकीय नोकरीत, रेल्वे भरतीत एक टक्काही मराठी मुलांना स्थान नाहीत. मुंबईत यांना मराठी मुले मिळत नाहीत. हा भूमिपूत्रांवर अन्याय असून महाराष्ट्रात नोकरीत माणसाला, भूमिपूत्राला प्राधान्य द्या, अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी असल्याकडेही सावंत यांनी लक्ष वेधले आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एक जाहिरात दिली. त्या जाहिरातीत कंत्राटी पद्धतीने नोकरभरती केली जाणार होती. त्यासाठी १५ जाहा भरल्या जाणार होत्या. २० मुले आली आणि त्यापैकी १२ जागा भरल्या गेल्या. सगळ्या जागा पाहिल्या तर यातील एकही उमेदवार मुंबईचा नाही, महाराष्ट्राचा नाही. आयकर विभागातही हेच सुरू असून १२०० उमेदवारांमध्ये फक्त तिघे मराठी आहेत.
मराठी अवगत नसलेल्या लोकांना मुंबई रेल्वेमध्ये भरती केले जात आहे. ही परप्रांतीयांना केंद्र सरकारने दिलेली देणगी असून रावसाहेब दानवे हे रेल्वे राज्यमंत्री आहेत, परंतू त्यांना किती अधिकार आहेत, हे माहीत नाही.
-अरविंद सावंत