ताज्या बातम्या महाराष्ट्र

पोलिसावर हात उचलणं भाजप आमदाराला भोवलं; सुनील कांबळेंविरोधात गुन्हा दाखल

पुणे

स्टेजवरुन उतरत असताना अडखळल्यावर सावरत असताना धन्यवाद मानण्याऐवजी कानशिलात मारणारे भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कर्तव्य पार पाडताना अडथळा निर्माण केल्यावर हा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात पोलीस अंमलदार शिवाजी सरक (३५) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. ससून रुग्णालयातील कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. यावेळी स्टेजवर उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक नेते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवाजी सरक बंदोबस्तासाठी थांबले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सुनील कांबळे स्टेजवरुन खाली उतरत असताना त्यांचा पाय अडखळल्या, यावेळी शेजारी उभ्या असलेले अंमलदार शिवाजी सरक यांनी आमदारांना सावरले. यानंतर डाव्या हाताना सुनील कांबळे यांनी शिवाजी यांच्या कानशिलात मारली. फिर्यादी यांनी त्यांना पोलीस असल्याचं सांगितले तरी आमदारांना ‘मग काय झालं’ अशा शब्दात त्यांना दरडावलं. यानंतर शिवाजी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात