मुंबई
भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारातील पदाधिकारी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटात मातोश्रीवर पक्ष प्रवेश करणार आहेत. आज दुपारी ते उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश करणार आहेत. भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
प्रदिप उपाध्याय भाजपा उत्तर मुंबई जिल्हा सचिव, घनश्याम दुबे विश्व हिंदू परिषद: गोरेगाव विभाग धर्माचार्य प्रमुख, राष्ट्रीय कार्याध्यक्ष:भारतीय ब्राम्हण स्वाभिमान परिषद, रविचंद्र उपाध्याय : विश्व हिंदू परिषद : जिल्हा कोषाध्यक्ष (माजी) उत्तर मुंबई , बोरिवली; अक्षय कदम आंतरराष्ट्रीय बजरंग दल, उत्तर मुंबई जिल्हा उपाध्यक्ष; माधवी शुक्ला भाजपा जिल्हा महिला उपाध्यक्ष (पूर्व) मिरा – भाईंदर; राम उपाध्याय भाजपा जिल्हा महासचिव मीरा – भाईंदर; संजय शुक्ला अखिल भारतीय ब्राम्हण परिषद:राष्ट्रीय महासचिव; प्रदिप तिवारी शिंदे गट जिल्हा महासचिव मीरा – भाईंदर; दिपक दुबे विश्व हिंदू परिषद:जिल्हा सुरक्षा प्रमुख, बोरिवली; दिनेशकुमार यादव विश्व हिंदू परिषद :तालुका प्रमुख( प्रखंड) बोरिवली; सूरज दुबे बजरंग दल तालुका(प्रखंड) प्रमुख.. यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या गटात पक्षप्रवेश करणार आहेत. शिवसेना नेते विनायक राऊत, विभाग प्रमुख उद्देश पाटेकर आणि संघटक उद्धव कदम यांच्या मार्गदर्शनात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. या पक्षप्रवेशमुळे मुंबईत ठाकरे गटाला फायदा होऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे युवा नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसची साथ सोडून शिंदेच्या शिवसेना गटात सामील झाले आहेत. त्यांच्या या पक्षप्रवेशाने अनेकांना धक्का बसला होता. देवरा या कुटुंबाचे गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेससोबतचे नाते काही दिवसांपूर्वी संपले.