ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील’ गोळीबार करणाऱ्या आमदाराचं वक्तव्य; वडेट्टीवारांचा मोठा दावा

मुंबई

भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलिस स्थानकात तेही पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे. भाजपवाल्यांचे बॉस “सागर” बंगल्यावर आणि शिंदे गटाचे “बॉस” वर्षा बंगल्यावर बसून आहेत. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे. गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात. कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारचा समाचार घेतला.

गणपत गायकवाड काय म्हणाले?
एकनाथ शिंदेनी उध्दव ठाकरेंसोबत गद्दारी केली, ते भाजपसोबत सुद्धा गद्दारी करणार आहे. एकनाथ शिंदेनी दुसऱ्यांचे आयुष्य खराब केले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत महाराष्ट्रात फक्त गुन्हेगार पैदा होतील. महाराष्ट्रात गुंड घडवण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहे. एकनाथ शिंदेंनी माझे करोडो रुपये खाल्ले, त्यांनी आणि त्यांच्या खासदार मुलाने सगळीकडे भ्रष्टाचार करून ठेवला आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपुढे या सर्व गोष्टी मी मांडल्या पण त्यांनी त्यावर काही कारवाई केली नाही.

वरील जबाब गोळीबार करणाऱ्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. यावर वडेट्टीवर म्हणाले, महायुतीतील आमदार गणपत गायकवाड यांचे हे शब्द ऐकून महाराष्ट्रातील जनतेला आज खालील गोष्टींची खात्री पटलेली आहे.

  1. एकनाथ शिंदे आणि त्यांचे ४० आमदार हे गद्दार आहेत हे भाजपला देखील मान्य आहे
  2. स्वतःचे राजकीय स्वार्थ साधण्यासाठी भाजप आणि शिंदे गट एकमेकांसोबत पुढे सुद्धा गद्दारी करतील.
  3. महाराष्ट्रात आज गुन्हेगार आणि गुंडांच राज्य आहे, त्यामुळे सामान्य माणसाला घाबरून गप्प बसण्यापलीकडे पर्याय नाही.
  4. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गुंडांची जी दादागिरी महाराष्ट्रभर सुरू आहे याची त्याची पूर्ण माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली होती असे खुद्द भाजप आमदार सांगत आहे तरी यावर कारवाई होत नाही.

सुसंस्कृत महाराष्ट्राचा महायुतीने युपी, बिहार करून ठेवला. सत्ताधारी आमदार पोलिस स्थानकात गोळीबार करत आहे, सत्ताधारी आमदार पोलिसांवर हात उचलत आहे,सत्तेचा माज, बंदूकीचा वापर, बदला हे सगळं आज महाराष्ट्राच्या राजकारणात घडत आहे. महाराष्ट्रात जे सुरू आहे तीच खरी मोदींची गॅरंटी आहे, असंही विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात