मुंबई
महाराष्ट्राच्या राजकारणावर दबदबा असलेल्या पवार घराण्यातील तिसरी पिढीही राजकारणात सक्रिय आहे. आता पवार घराण्याचा आणखी एक वारसदार राजकारणात येत आहे. मात्र त्याने सत्तेत असलेल्या अजित पवारांच्या गटात जाण्याऐवजी शरद पवार यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार यांचे बंधु श्रीनिवास पवार यांचा सुपूत्र युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या गटात जाण्यापेक्षा शरद पवार यांच्या गटात जाणे पसंत केले आहे. युगेंद्र पवार आज बुधवारी शरद पवार गटात प्रवेश करतील.
कोल्हापूरात आज बुधवारी सकाळी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी युगेंद्र पवार यांच्या पक्षप्रवेशाविषयी विचारणा करण्यात आली. युगेंद्र पवार आधी अजित पवार गटात होते, आता ते शरद पवार गटात येत असल्याबद्दल पवारांना विचारण्यात आलं. यावर शरद पवारांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. मूळात युगेंद्र पवार हे राजकारणात आहेत, हेच मला माहिती नव्हते. ते व्यावसायिक आहेत. त्यांचा मोठा व्यवसाय आहे. ते अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपूत्र आहे. युगेंद्र अमेरिकेतून शिकून आल्याची माहिती शरद पवारांनी दिली.
कोण आहे युगेंद्र पवार?
अजित पवार यांचे धाकडे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपूत्र आणि शरद पवारांचे नातू. युगेंद्र पवार हे शरयू अॅग्रोचे सीईओ आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार आहेत. याशिवाय बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्षही आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र यांनी आजोबा शरद पवारांना साथ दिली आहे. सोशल मीडियावर ते आजोबांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात.