ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

महाविकास आघडीच्या बैठकीला वंचितचे प्रतिनिधी लावणार हजेरी

पुणे : महाविकास आघाडीची जागावाटपाची महत्त्वाची बैठक आज होणार आहे. या बैठकीत राज्यातील सर्व घटकपक्षाचे नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी पाठवणार असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, आज पुण्यात अत्यंत महत्त्वाची सत्ता परिवर्तन महासभा होणार असूनही वंचित बहुजन आघाडी मुंबईत होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीला आपले प्रतिनिधी पाठवणार आहे.

24 फेब्रुवारीच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यासह 2 फेब्रुवारीनंतर कोणत्याही अंतर्गत चर्चा किंवा कार्यक्रमात महाविकास आघाडीद्वारे वंचित बहुजन आघाडीला सहभागी किंवा आमंत्रित केलेले नसले तरीही, आम्ही महाविकास आघाडीविषयी सकारात्मक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीला आतापर्यंत निश्चित झालेल्या जागा वाटपासंदर्भात माहिती देण्याची विनंती करणार आहे. या आधी 2 फेब्रुवारीला मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये तीन पक्षांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या आमच्या शेवटच्या बैठकीतही आम्ही हीच विनंती केल्याचेही त्यांनी सांगितले.

Rajkaran Bureau

About Author

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात