महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती लढतीचे चित्र 

By Supriya Gadiwan

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Loksabha) मतदारसंघासाठी सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता महायुतीकडून खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) विरुद्ध महाविकास आघाडीकडून शाहू छत्रपती (Shahu Maharaj) अशा संभाव्य लढतीचे चित्र दिसत आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे (Mahayuti) उमेदवार म्हणून खासदार संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) एकमताने करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल अशीच शक्यता आहे. याबाबतचे स्पष्ट संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole on Shahu Maharaj) यांनी दिले होते. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

महायुतीचे संजय मंडलिक यांनी मतदारसंघात सर्वत्र संपर्क दौरे सुरू केल्याने, त्यांची उमेदवारी ग्राह्य धरली जात आहे. दुसरीकडे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej patil) यांनी कोल्हापूर लोकसभेबाबत बोलताना महाविकास आघाडीचे पत्ते पिसले असल्याचे म्हटले आहे. या लोकसभेसाठी डाव सुद्धा आखला आहे. डावातील एक्का महाविकास आघाडीकडे असेल तसेच महायुतीमध्ये सगळं अलबेल नसल्याचा दावाही सतेज पाटील यांनी केला आहे.

प्रामुख्याने कोल्हापूर (Kolhapur) हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. या जिल्ह्यात भाजपा (BJP), शिवसेनेला (Shivsena) तितका शिरकाव करता आलेला नाही. शिवसेनेचे जे आमदार २०१४ मध्ये निवडून आले होते, ते मूळचे को काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे होते.

सध्याची राजकीय परिस्थिती फारच वेगळी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांची शकलं उडाली आहेत. त्याच वातावरणात लोकसभा (Loksabha Election) निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरकर लोकसभेला कोणाच्या अंगावर गुलाल उधळतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कोल्हापूरकर मतदार कोणाला पराभूत करायचे हे आधी ठरवतात आणि निवडून कोणाला आणायचे हे नंतर अशी इथल्या मतदारांची ओळख आहे. म्हणूनच आमचे ठरले आहे ही टॅगलाईन इथेच प्रसिद्ध आणि यशस्वी झाली होती. त्यावेळी काँग्रेसचे सतेज ऊर्फ बंटी पाटील आणि राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ एकत्र होते. आता दोघेही एकमेकाचे राजकीय विरोधक आहेत अशा वेळी ही जागा राखणे सेनेला अर्थात महायुतीला जमेल की तिला धोबीपछाड देत महविकास आघाडी बाजी मारेल हे निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात