X: @therajkaran
मुंबई: महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी आज निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे निवडणुकीसाठी आमदार सतेज पाटील (Satej Patil) पूर्ण तयारीने उतरले असून त्यांनी ‘ जनतेनेच ठरवलंय’ ही नवीन टॅगलाईन जाहीर केली आहे. या टॅगलाईनखाली काँग्रेस (Congress) निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे.
पाटील म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) राज्यातील जनता विरोधात महायुती अशीच ही लढाई असेल. जनता स्वतः आता निवडणूक हातात घेणार आहे. ‘जनतेनं ठरवलंय’ या टॅगलाईन खाली काँग्रेस लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगत या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीन सामोरे जाऊ, आमच्या आघाडीकडून जागांवर किमान चर्चा होत आहे. मात्र, महायुतीमध्ये अजूनही गोंधळ कायम असल्याच दिसून येत आहे. मात्र आम्ही इतिहासात न जाता मी पुढील भविष्याचा वेध घेणार आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, शाहू महाराज यांच्याबद्दल आदराचे स्थान असेल, यांना बिनविरोध निवडून द्या, असे आव्हान त्यांनी हसन मुश्रीफ यांना केले आहे. शाहू महाराजांनी ही निवडणूक नक्कीच लढवावी, यासाठी आम्ही त्यांना वारंवार विनंती केलीय. पुरोगामी विचार दिल्लीपर्यंत जावा यासाठी आमचा प्रयत्न होता, असेही त्यांनी सांगितले.