X: @therajkaran
मुंबई: मुंबई महानगरपालिकेची कंत्राटे म्हणजे संघटित लुटीशिवाय दुसरे काहीच नाही; भाजपला दलित आणि बहुजन विरोधी म्हणत, भाजपच्या नेतृत्वाखालील खोके सरकार आणि बहुधा विधान परिषद सदस्य प्रसाद लाड आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कंपनीला स्वच्छतेच्या कामाची कंत्राटे देण्याचा भाजपचा डाव आहे, अशी टिका मुंबई आम आदमी पार्टीने केली आहे.
आम आदमी पार्टीने आज मुंबई महापालिकेविरोधात पालिका मुख्यालयासमोर पीडीत सफाई कामगारांना पाठिंबा देण्यासाठी इंडिया आघाडीच्या इतर घटक पक्षांबरोबर आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दत्तक वस्ती संस्था आणि स्वच्छता कर्मचारी ज्यांचे कंत्राट मुंबई महापालिकेने रद्द केले आहे, त्यांच्या समर्थनार्थ ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता.
“बहुसंख्य मुंबईकर झोपडपट्ट्यांमध्ये राहतात. सर्व प्रकारचे दुर्लक्ष आणि गैरसोय असतानाही, हे स्वच्छता कर्मचारीच मुंबईतील सर्व झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी कठोर परिश्रम घेतात. आम्हाला समजले आहे की मुंबई महानगरपालिकेने दत्तक वस्ती संस्थेसोबतचा करार रद्द केला आहे आणि ३६० कोटींच्या एक अत्यंत फुगलेल्या बजेट असलेली ग्लोबल टेंडर देण्याच्या तयारीत आहे, जे साहजिकच भाजपच्या नेतृत्वाखालील खोके सरकारच्या मित्रांना जाईल आणि बहुधा भाजपचे नेते प्रसाद लाड यांचे कुटुंबीय आणि मित्रांद्वारे संचालित क्रिस्टल कंपनीला दिले जाईल. शिवाय, मुंबईतील सर्व १०,००० सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी आणखी एका मोठ्या रकमेचे टेंडरही दत्तक वस्ती संस्थेकडून काढून घेतले जात आहे आणि इतर कोणत्याही टेंडर सारखेच भाजपच्या नेतृत्वाखालील खोके सरकारचे मित्रांना किंवा भाजपच्या नेत्यांना बी.एम.सी. कडून दिले जात आहे.”, असे आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा, प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले.
“हा स्पष्टपणे मुंबईच्या कष्टकरी सफाई कर्मचाऱ्यांवरचा हल्ला आहे. या सफाई कर्मचाऱ्यांनीच मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मुंबईकरांना जुनाट आजार होऊ नयेत आणि त्यांना जगता यावे यासाठी स्वच्छता राखली आहे. मुंबई आणि मुंबईकर कोविड-१९ महामारीला पराभूत करू शकले हे त्यांचेच कृतज्ञ आहे. कार्यकाळ दोन वर्षांपूर्वी संपलेला असताना ही,मुंबई महापालिकेच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. महापालिकेचे कंत्राटे हे भाजपने केलेली लूट शिवाय दुसरे काही नाही.”, असे, आम आदमी पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष, रुबेन मस्करेन्हास यांनी सांगितले.
“आम्ही मागणी करतो की खाजगी कंपनीला दिले जाणारे ग्लोबल टेंडर तात्काळ रद्द करावे आणि दत्तक वस्ती संस्थेसोबत महापालिकेने पूर्वी केलेले कंत्राट सुधारून या संस्थांना करारांमध्ये पूर्वी नमूद केलेल्या दरापेक्षा जास्त दराने व पुरेशा प्रमाणात शुल्क दिले जावे. आम आदमी पार्टी सफाई कामगारांच्या हक्कासाठीच्या खऱ्या संघर्षाला पाठिंबा देत राहील आणि सर्व सफाई कामगारांना न्याय मिळेल याची खात्री करेल.”, असे आम आदमी पार्टी मुंबईचे सरचिटणीस पायस वर्गीस म्हणाले.
Also Read: अग्निशमन दलाच्या नव्या भरतीच्या जवानांना ना भत्ता ना वेतन