X: @therajkaran
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी इचलकरंजी येथील जाहीर सभेत बोलताना मोदी आणि भाजपासह (BJP) काँग्रेसवरही (Congress) टीकास्त्र सोडल आहे. एकीमध्ये बिघाड करणं हा काँग्रेसचा अजेंडा आहे, कारण त्यांच्यातील एक मुख्यमंत्री गेला आहे, आता दुसरा मुख्यमंत्री राहिला आहे. अशातच माजी मुख्यमंत्र्यांना राज्यपाल पदाची ऑफर देण्यात आली आहे. काँग्रेसच्या एकीमध्ये बिघाड केला तर मे-जूनमध्ये ते कुठल्यातरी राज्याचे राज्यपाल म्हणून जातील, असे अनेक सुपारीबहादर काँग्रेसमध्ये आहेत, असं आंबेडकर म्हणाले आहेत.
काँग्रेसमधील सुपारीबहाद्दरांना आवरलं नाही तर निवडणुकांनंतर तुम्ही जेलमध्ये जाल. तुम्हाला मी आव्हान करतो. तुम्ही भुरटे चोर आहात. त्या भुरट्या चोरीची कबुली द्या. लोक तुम्हाला माफ करतील अशा शब्दांत प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना सल्ला दिला आहे. तसेच पक्षाच्या महिला विंगच्या अध्यक्षांनी मोदींच्या घरासमोर धरणं द्यावं. त्यांना एवढंच सांगावं की हिंदूंना एकत्र येण्याचा सल्ला तुम्ही देताय, तर आधी तुमच्यापासून सुरुवात करा. पती-पत्नी एकत्र राहायला शिका’. आज काँग्रेसवाले आम्हाला सांगायला लागलेत की भाजपासमोर आपण लढलं पाहिजे. आधी लढायला तर शिका आणि मग उपदेश द्या असं आंबेडकर म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी Lok Sabha) Election) प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी अजून मविआच्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. अजूनही प्रकाश आंबेडकर मविआमध्ये आहेत की नाहीत? याविषयी कोणताही स्पष्ट निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही.