मुंबई : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) ईडी (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. किर्तीकर यांना आज पुन्हा ईडीकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आलं आहे . यासाठी आज ते ईडी कार्यालयात हजर राहणार आहेत.त्यामुळे लोकसभा निवडणुकीआधीच ठाकरेच्या शिलेदाराची ईडीकडून चौकशी होणार आहे .
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ( Shivsena Uddhav Thackeray Group) उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघांमध्ये (Mumbai North West Lok Sabha Constituency) अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र मुंबई महापालिकेत कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळाप्रकरणी आज कीर्तीकर यांना ईडीकडून पुन्हा समन्स देण्यात आलं आहे . आता निवडणुकीआधी त्यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. याआधी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सप्टेंबर महिन्यामध्ये याच कथित खिचडी घोटाळा प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केल्यानंतर या सगळ्याचा तपास ईडीकडून केला जात आहे. यामध्ये कथित खिचडी घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. आता अमोल कीर्तीकर यांच्यावर ईडीची टांगती तलवार आहे.
मुंबई महानगरपालिकेचा 100 कोटींचा कोविड घोटाळा समोर आला आहे. गरिब स्थलांतरीत कामगारांसाठी, ज्यांचे स्वत:चे मुंबईत घर नाही त्यांना लॉकडाऊन काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय तत्कालीन सरकारनं घेतला होता. भारत सरकारचंही त्याला समर्थन होतं. या स्थलांतरीत कामगारांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट 52 कंपन्यांना मुंबई महानगरपालिकेनं दिलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडी पॅकेट वाटण्यात आलं होतं, असं मनपाचं म्हणणं आहे. पण यामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे.