मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या हातकणंगले मतदारसंघात (Hatkanangle Lok Sabha) शिवसेना ठाकरे गटाने अखेर मविआकडून शाहूवाडी पन्हाळाचे माजी आमदार सत्यजित पाटील (Satyajeet Patil) यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केल आहे . याआधीच येथे शिवसेनेकडून खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane)आणि शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti)हे मैदानात आहेत. त्यात आता ठाकरे गट सत्यजित पाटील यांना उमेदवारी देणार असल्याने, हातकणंगले मतदारसंघात तिहेरी लढत होणार आहे.
या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे धैर्यशील माने हे खासदार आहेत. त्यांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची उमेदवारी वेटिंगवर होती. मात्र शिवसेनेने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवार यादीत धैर्यशील माने यांचं नाव होतं. त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. दरम्यान, या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी हे सुरुवातीपासून आग्रही आहेत. त्यांनी दोनवेळा मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच मविआने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यासाठी हा लोकसभा मतदारसंघ सोडला होता. मात्र राजू शेट्टी यांनी बाहेरून पाठिंबा महाविकास आघाडी द्यावा असा प्रस्ताव ठेवला. शिवाय ते महाविकास आघाडीत येण्यास उत्सुक नसल्याचे त्यांनी सांगितले होते . त्यामुळे ठाकरे गट आता कट्टर शिवसैनिक सत्यजित पाटील यांना रिंगणात उतरणार आहेत .दरम्यान शिवसेनेचे माजी आमदार सुजीत मिणचेकर आणि सत्यजित पाटील दोघांना मातोश्रीवर उद्या किंवा परवा बोलावणार आहेत.
दुसरीकडे दरम्यान, धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवर आता टांगती तलवार आहे.कारण त्यांच्या मतदारसंघांमधील नाराजी दूर करण्यात मात्र त्यांना कमालीची कसरत करावी लागत आहे. अंतर्गत विरोध होत असतानाच भाजपमधील नेत्यांचा सुद्धा त्यांना कडाडून विरोध होत आहे. मतदारसंघातून गायब झाल्याच्या आरोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून सडकून टीका होत असतानाच आता भाजप नेत्यांच्या नाराजीला सुद्धा सामोरे त्यांना जाव लागत आहे.आता त्यांच्याऐवजी मातोश्री आणि माजी खासदार निवेदिता माने (Nivedita Sambhajirao Mane)यांना उमदेवारी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत .