मुंबई ताज्या बातम्या राष्ट्रीय

विधानसभा निवडणूक : एक्झिट पोल्सनुसार राजस्थान, मध्य प्रदेशात भाजपची सत्ता?

Twitter: @therajkaran

Assembly Election 2023 Exit Poll:

मुंबई

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगना आणि मिझोराम, या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडल्या. तेलंगनात मतदान पूर्ण झाल्यानंतर एग्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. अधिकतर एग्झिट पोलमध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशात भाजपला आघाडी मिळण्याचा अंदाज लावला जात आहे, तर दुसरीकडे तेलंगना आणि छत्तीसगडात काँग्रेसला आघाडी मिळणार असल्याचं दिसून येत आहे. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेसची सत्ता आहे. तर मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. MNF चे जोरमंथागा मिझोरामचे मुख्यमंत्री आहेतर आणि BRS चे के.के चंद्रशेखर राव तेलंगनात सत्तेत आहेत. विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A. युतीसाठी पाचही राज्याच्या निवडणुकीचे निकाल अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहेत.
ही निवडणूक म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल असल्याचे म्हटले जात आहे. या पाचही राज्यांच्या निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. मात्र निकालापूर्वीच विविध संस्थांचे एग्झिट पोल समोर आलेत.

कोणत्या संस्थांचा काय आहे अंदाज?

  • ‘इंडिया टुडे-एक्सिस मॉय इंडिया’ च्या एग्झिट पोलमध्ये राजस्थानात काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र इतर अनेक एग्झिट पोलमध्ये भाजपला फायदा मिळण्याचा अंदाज आहे.
  • ‘टीवी9-पोलस्ट्रेट’च्या एग्झिट पोलनुसार, राजस्थानमध्ये भाजप 100 ते 110 जागा मिळवून सरकार स्थापित करू शकते. तर सत्तेवर असलेल्या काँग्रेसला ९० ते १०० जागा मिळू शकतात. या सर्वेक्षणानुसार राजस्थानमध्ये इतर पक्षांना १५ जागा मिळू शकतात.
  • ‘टाइम्स नाउ-ईटीजी’ च्या एग्झिट पोलनुसार, राजस्थानात भाजपला १०८ ते १२८ जागेसह बहुमत मिळू शकतं. तर काँग्रेसला ५६ ते ७२ जागांवरच समाधान मानावं लागेल.
  • ‘इंडिया टुडे-एक्सिस मॉय इंडिया’ च्या एग्झिट पोलनुसार, राजस्थानात सत्तेवर असलेल्या काँग्रेसला ४२ टक्के मतांसह ८६ ते १०६ जागा मिळू शकतात. तर भाजप ४१ टक्के मतांसह ८० ते १०६ जागांवर हक्क सांगू शकतात.

  • ‘न्यूज 24-टुडेज चाणक्या’च्या एग्झिट पोलनुसार, मध्य प्रदेशात भाजपला ४५ टक्के मतांसह १५१ जागा तर भाजपला ३८ टक्के मतांसह ७४ जागांवर समाधान मानावं लागेल.
  • ‘टीवी9-पोलस्ट्रेट’ च्या एग्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात काँग्रेसला निर्णायक वाढ मिळण्याचा अंदाज असून काँग्रेसला २३० सदस्यीय विधानसभेत १११-१२१ जागा मिळू शकतात. येथे भाजपच्या खात्यात १०६-११६ जागा येऊ शकतात.
  • ‘इंडिया टीवी-सीएनएक्स’च्या एग्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळू शकते. मात्र भाजपला काही प्रमाणात फायदा मिळण्याची शक्यता असून ११६ जागांवर तर काँग्रेसला १११ जागा मिळू शकतात.
  • ‘रिपब्लिक-मैट्रिज’च्या एग्झिट पोलमध्ये मध्य प्रदेशात भाजपला पूर्ण बहुमत मिळण्याचा अंदाज असून यानुसार भाजपला ११८-१३० जागा मिळू शकतात आणि काँग्रेसला ९७ ते १०७ जागा मिळू शकतात.
  • ‘न्यूज 24-टुडेज चाणक्य’ च्या एग्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळू शकतं. या एग्झिट पोलच्या आकड्यांनुसार, काँग्रेसला ५७ तर भाजपला ३३ जागा मिळू शकतात.
  • ‘इंडिया टुडे-एक्सिस मॉय इंडिया’ च्या एग्झिट पोलनुसार, छत्तीसगडमध्ये ९० सदस्यीय विधानसभेत काँग्रेस ४२ टक्के मतदानासह ४० ते ५० जागा मिळू शकतात. तर भाजपला ४१ टक्के मतांसह ३६ ते ४६ जागांवर समाधान मानावं लागेल.
  • ‘एबीपी-सी वोटर’च्या एग्झिट पोलमध्ये दिल्यानुसार, छत्तीसगडमध्ये काँग्रेसला ४१ ते ५३ जागा मिळू शकतात तर भाजपला ३६ ते ४८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
  • ‘जन की बात’ च्या एग्झिट पोलमध्ये दिल्यानुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेसला ४२ ते ५३ जागा मिळू शकतात.
  • अधिकतर एग्झिट पोलमध्ये तेलंगना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा झाल्याचं दिसून येत आहे. ‘इंडिया टीवी-सीएनएक्स’च्या एग्झिट पोलनुसार, ११९ सदस्यीय विधानसभेत काँग्रेस ६३-७९ जागा मिळवू शकतील. भारत राष्ट्र समितीला ३१-४७, एआयएमआयएमला ५-७ आणि भाजपला २-४ जागा मिळू शकतील.
  • ‘टीवी9-पोलस्ट्रेट’च्या एग्झिट पोलमध्ये दिल्यानुसार, काँग्रेसला ४९-५९ जागा आणि बीआरएसला ४८ ते ५८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपला ५ ते १० तर एआयएमआयएमला ६ ते ८ जागा मिळू शकतात.
  • ‘रिपब्लिक टीवी-मैट्रिज’ नुसाप तेलंगनात काँग्रेस ५८ ते ६८ जागा जिंकून सरकार स्थापन करू शकते तर बीआरएसला 46 ते 56 जागा मिळू शकतात. भाजपला ४ ते ९ आणि एआयएमआयला ६ ते ८ जागा मिळू शकतात.
  • अधिकतर एग्झिट पोलमध्ये मिझोराममध्ये मनविभाजनाचा अंदाज वर्तवला आहे. ‘इंडिया टीवी-सीएनएक्स’च्या एग्झिट पोलमध्ये मिजो नॅशनल फ्रंटला (एमएनएफ) 40 सदस्यीय विधानसभेत १४ ते १८ जागा मिळू शकतात आणि ते सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येऊ शकतात. जोराम पीपल्स मूव्हमेंटला (जेडपीएम) १२ ते १६ जागा मिळू शकतात तर काँग्रेसला ८ आणि भाजपला अधिकांश दोन जागा मिळण्याचा अंदाज आहे.
Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे