महाराष्ट्र ताज्या बातम्या

आदिवासी बांधवांच्या घरांवरील कारवाईला वनमंत्र्यांची स्थगिती; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)ची मागणी मान्य

मुंबई – संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरातील बोरिवली पूर्व येथील आदिवासी बांधवांच्या घरांवर सुरू असलेल्या तोडकाम कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मागणीनंतर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी ही कारवाई तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

या संदर्भात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने विभागप्रमुख उदेश पाटेकर, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य व विधानसभा निरीक्षक शशिकांत झोरे, तसेच स्थानिक नगरसेविका सारिका शशिकांत झोरे यांनी मंत्रालयातील वनमंत्र्यांच्या दालनात निवेदन सादर केले होते.

निवेदनातील मुद्द्यांची सविस्तर माहिती घेतल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी आदिवासी बांधवांच्या घरांवर सुरू असलेल्या तोडकाम कारवाईला महाराष्ट्र शासनातर्फे स्थगिती देण्याचे आदेश वन विभागाला दिले.

यावेळी नगरसेवक श्री. धरम काळे, ऍड. संदेश नारकर, महेश मोरे, प्रशांत वरठे, विनायक मराठे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

योगेश त्रिवेदी

About Author

योगेश त्रिवेदी (Yogesh Trivedi) हे ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आहेत. त्यांनी सामना या प्रखर हिंदुत्ववादी आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या मराठी वृत्तपत्रात सर्वाधिक काळ पत्रकारिता केली.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात