मुंबई
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांचा शिव्या देत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओनंतर अनेकांनी जरांगे पाटलांच्या विधानांवर आक्षेप नोंदवला होता. आता मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढाईतील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारस्करांनी जरांगे पाटलांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
जरांगे अनेकदा गुप्त बैठका घेतो. यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी असतात. रांजन गाव गणपती येथे उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठक घेतली होती. लोणावळा, वाशी येथेही समाजाला वगळून बैठक घेतली होती. या बैठकांवर माझा आक्षेप होता, या बैठकांआडून काहीतरी घडत असल्याचा संशय बारस्कर यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगे हे रोज पलटी मारतात, रोज खोटं बोलतात असा आरोप बारसकर यांनी केला. अजय बारस्कर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला.
- जरांगेने कधीच सरकारला निवेदन दिलेलं नाही. त्याच्या चार मागण्या माझ्याकडे लिहिलेल्या आहेत. मात्र जरांगे नेहमी पटली मारतो. गुप्त बैठकीत जरांगे एक बोलतो आणि बाहेर कॅमेऱ्यासमोर दुसरं बोलतात. जरांगे पाटील पारदर्शक असल्याचं दाखवतात, त्यामुळे मराठा समाजाचा त्यांच्यावर विश्वास आहे. मात्र प्रत्यक्षात विविध उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसोबत तो गुप्त बैठक घेतो. जरांगे खोटं बोलतो आणि वारंवार पलटी मारतो.
- जरांगे सामाजिक विध्वंस पसरवतात. सुमंत भागेंना सार्वजनिक ठिकाणी वंजारी असा उल्लेख केला आणि त्यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा करीत होते. वाशीला आल्यानंतर अध्यादेशावर चर्चा आणि तपास करणार असल्याचं सांगितलं. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही वकिलाकडून त्याने अध्यादेश तपासून घेतला नाही.
- मुख्यमंत्र्यांनी वाशीत येऊन उपोषण संपवावं यासाठी राज्य सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. जरांगे पारदर्शक नाही. जरांगेंनी मराठ्यांची घरं उद्ध्वस्त केली.
- जरांगे पाटील अधिकाऱ्यांशी बोलताना अपशब्दाचा वापर करतो. त्यांना शिव्या देतो. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला. तो मी सहन करणार नाही. जरांगे यांना लोकं पाणी प्या म्हणत होते, तेव्हा मी त्यांना पाणी पाजायला गेलो. मात्र तेव्हा त्यांना वाटलं माझ्या हातून पाणी प्यायल्याने, मी मोठा होईल म्हणून नाय प्यायला. मला तिथे म्हणाला संत फिंत गेले खड्यात. तिथून माझा वाद सुरु झाला