कल्याण : मोहने आणि टिटवाळा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे अभिवचन भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिले. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे माजी राज्यसभा खासदार व्ही. मुरलीधरन यांच्या खासदार निधीतून गाळेगाव परिसरात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
नरेंद्र पवार यांनी सांगितले की, कल्याण विधानसभा मतदारसंघ आणि परिसरात अनेक महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्प वेगाने सुरू आहेत. काही कामे केंद्र सरकारच्या अखत्यारीत तर काही राज्य सरकारमार्फत होत आहेत, त्यामुळे कल्याण आणि आसपासचा परिसर वाहतूक आणि विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा केंद्रबिंदू बनत आहे.
“मुंबईतून महाराष्ट्रातील तसेच देशातील कोणत्याही भागात जाण्यासाठी आवश्यक असणारी रस्ते कनेक्टिव्हिटी कल्याणच्या आसपास उभी राहत आहे. भविष्यात हा परिसर ‘तिसरी मुंबई’ म्हणून नावारूपाला येईल आणि त्यात मोहने-टिटवाळा परिसराचा मोठा वाटा असेल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यसभेचे माजी खासदार व्ही. मुरलीधरन यांच्या खासदार निधीतून गाळेगाव परिसरात अंतर्गत रस्ते आणि झाकणासह गटार बांधकाम यांसारख्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, भाजपा मोहने-टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तीवान भोईर, माजी नगरसेवक जनार्दन पाटील, अनंता पाटील, अपर्णा पाटील, संतोष शिंगोळे, रमेश कोनकर, मोहन कोनकर, सतिश पाटील, भूषण मिश्रा, मुकेशकुमार कनोजिया, विजय पाटील, रामा पाटील, रंजना भामरे, सुरज सुतार तसेच गावातील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, युवा बांधव आणि भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.