X: @therajkaran
मुंबई: केंद्रीय मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी जळगाव शहरातील सागर पार्कवर 25 हजार युवकांसोबत संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शदरचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. महाराष्ट्राची जनता शरद पवार यांना 50 वर्षांपासून सहन करते आहे. शरद पवार यांनी मागील 50 वर्ष सोडून द्या, किमान जनतेला 5 वर्षाचा हिशोब द्यावा, मी 10 वर्षाचा हिशोब द्यायला तयार आहे, असे आव्हान अमित शहा यांनी केले आहे. (The people of Maharashtra have been tolerating Sharad Pawar for 50 years Amit Shah demanded an accounting)
युवकांना संबोधित करताना अमित शहा म्हणाले की, मी याठिकाणी येणाऱ्या निवणुकीबाबात बोलायला आलो आहे. मोदींना (Modi) पुन्हा पंतप्रधान (PM) बनवण्यासाठी निवडणूक होत आहे. विकसित भारत बनण्यासाठी निवडणूक होत आहे. आगामी निवडणूक 2047 च्या विकसित भारतासाठी आहे. भाजपा आणि मोदींची नाही तर युवकांची निवडणूक आहे. पुढच्यावेळी व्यासपीठावर वेगळे नेते असतील पण युवकांचा विकास झालेला असेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
दरम्यान, इंडिया आघाडीवर (I.N.D.I.A. Alliance) निशाणा साधताना अमित शहा म्हणाले की, मोदींविरोधात तयार झालेली आघाडी कमजोर आहे. घराणेशाही पुढे नेणारा पक्ष देशाचा विकास करू शकत नाही. महाविकास आघाडीचे तिन्ही टायर पंक्चर आहेत. ते फक्त त्यांच्या मुला – मुलींना सत्तेत बसवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरेंना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री बनवायचे आहे, तर शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे, सोनिया गांधींना, राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचे आहे. सर्व पक्ष घराणेशाही मानणारे आहेत, असा हल्लाबोल अमित शहा यांनी केला.
Also Read: विद्यमान १३ खासदारांना तिकिट द्या : एकनाथ शिंदेचीं अमित शहांकडे मागणी