मुंबई – मुंबई उत्तर पशअचिम लोकसभा मतदारसंघआतील ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांमा प्रचारासोबत ईडीच्या चौकशीलाही सामोरं जावं लागणार आहे. कीर्तिकर यांची उमेदवारी ज्या दिवशी जाहीर झआली, त्याच दिवशी त्यांना खिचडी घोटाळ्या प्रकरणात ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावलं होतं. त्यानंतर कीर्तिकर हे अनरिचेबल झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांनी लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केलेली आहे.
कधी होणार चौकशी
८ एप्रिल रोजी अमोल किर्तीकर ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. आर्थिक गुन्हे शाखेनं यापूर्वीही त्यांची चौकशी केली होती. आताही केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणार असल्याची भूमिका घेत कीर्तिकर या चौकशीला सामोरे जाणार आहेत. किर्तीकर यांना ईडीचे हे दुसरे समन्स आहे. पहिल्या समन्सला अमोल कीर्तीकर गैरहजर राहिले होते. मात्र आता ८ एप्रिल रोजी चौकशीला ते हजर राहणार असल्याची माहिती आहे.
ईडी नोटिशीचा प्रचारात उल्लेख
विरोधकांकडून कीर्तिकर यांच्यावर खइचडीचोर अशी टीका करण्यात येतेय. खिचडी घोटाळ्यात कीर्तिकर यांनी मोठा मलिदा लाटल्याचा आरोपही करण्यात येतोय. तर कीर्तिकर हे एफआय़आरमध्ये आपलं नावच नसल्याचा दावा करतायेत. अमोल कीर्तिकर यांना ठाकरेंच्या नावाची घोषणा करण्यात आली नसली तरी अदयाप त्यांच्यासमोर कोण उमेदवार असेल हे स्पष्ट झालेलं नाही. त्यांचे वडील गजानन कीर्तिकर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून या जागी लढण्यास नकार दिलेला आहे. तर संजय निरुपम आज काँग्रेस सोडणार असल्याची माहिती असून ते शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास कीर्तिकर विरुद्ध निरुपम असा संघर्ष होईल.
हेही वाचाःमविआत अद्यापही दोन जागांवर तिढा कायम, सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघांवरुन घमासान