वायनाड : काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित जागा म्हणून केरळमधील वायनाड मतदारसंघाकडे पाहिले जाते. यंदाही राहुल गांधींनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र या मतदारसंघातून राहुल गांधींनी इंडिया आघाडीतील मित्रपक्षाविरोधात शड्डू ठोकला आहे. उत्तर भारतात काँग्रेसकडून इंडिया आघाडी एकजूट राहण्यासाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे दक्षिण भारतात मात्र इंडिया आघाडीला फारसं महत्त्व दिलं जात नसल्याचं स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील काही जागांवर मैत्रीपूर्व लढाई होणार असल्याचं सांगितलं जात असताना आता केरळमधील वायनाडमध्येही अशीच लढत पाहायला मिळणार आहे.
वायनाडमधून भारतीय कम्युनिस्ट पार्टी (CPI) च्या उमेदवार एनी राजा यांनी बुधवारी राहुल गांधींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी एनी राजा यांनी आपल्या मतदारसंघात रोड शोदेखील केला. एनी राजा मुळच्या केरळच्या असल्यामुळे त्यांचं या मतदारसंघात चांगलं काम आणि ओळख आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना वायनाडमधून ६४.७ टक्क्यांसह ७,०६,३६७ मतं मिळाली होती. तर दुसऱ्या क्रमांकावरील सीपीआयचे उमेदवार पीपी सुनीर यांना अवघे २५.१ टक्के मतांसह २,७४,५९७ मतं मिळाली होती.
२०२४ लोकसभेत राहुल गांधींविरोधात उभ्या राहिलेल्या एनी राजा कोण आहेत?
सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांच्या पत्नी आणि पक्षाच्या नेते एनी राजा सध्या भारतीय राष्ट्रीय महिला फेडरेशनच्या सरचिटणीस आहेत. एनी राजा कन्नूरच्या इरिट्टी येथे राहणाऱ्या आहेत. त्यांचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. एनी राजा या शाळेच्या दिवसातच सीपीआय ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचं सदस्यत्व घेतलं होतं. त्यानंतर ते वयाच्या २२ व्या वर्षी ऑल इंडिया युवा फेडरेशनमध्ये सामील झाल्याय