मुंबई : नुकत्याच राज्यातील लोकसभा निवडणुकांचं (Lok Sabha Election 2024) सर्व टप्प्यातील मतदान (Voting) पार पडलं आहे . अशातच आता 4 जूनला येणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी कंबर कसली आहे . अशातच आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांना सुप्रीम कोर्टाने (Supreme court)मोठा झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना उन्हाळाच्या सुट्टीकालीन पीठाने जामीन वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पुन्हा तिहार तुरुंगात जावं लागणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्चच्या रात्री सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली होती .. यापूर्वी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह हेसुद्धा याच प्रकरणी तुरुंगात आहेत. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी कोर्टाकडे आपली तब्येत ठीक नसल्याच्या कारणावरून तपासण्या करण्यासाठी वेळ मागितला आहे. केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात मिळालेला जामीन वाढवण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीकालीन पीठाचा जामीन वाढवण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे.त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे ..
कोर्टाच्या या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती महेश्वरी यांनी केजरीवाल यांना सरन्यायाधीशांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे. सरन्यायाधीश यावर सुनावणी घेतील, असे न्यायमूर्ती महेश्वरी म्हणाले. सुप्रीम कोर्टाने तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवाल यांना २ जूननंतर पुन्हा तिहार तुरुंगात जावं लागणार आहे.