X : @NalavadeAnant
नागपूर: विरोधी पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलू दिले नाही. विरोधी पक्षाने सभात्याग केल्यावर विरोधी पक्ष नेत्यांच्या अनुपस्थितीत विधेयके घाईगडबडीत मंजूर करून घेतल्याने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शुक्रवारी येथे तीव्र नाराजी व्यक्त केली. अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांच्या कार्यपद्धतीवर ही नाराजी व्यक्त करण्यात आली.
विरोधकांनी सभात्याग (walk out by opposition in Assembly) केल्यावर सत्ताधारी पक्षाने लक्षवेधी थांबवून विरोधक नाहीत ही संधी साधून वादग्रस्त चिटफंड (chitfund bill), वस्तू सेवा कर विधेयक GST bill) मंजूर करून घेतले. वस्तू सेवा कर या विधेयकद्वारे ऑनलाईन गेमिंग (online gaming), लॉटरी, बेटिंग, ऑनलाईन कॅसिनो (online casino) याला अधिकृत करण्याची मंजुरी मिळाली. ही विधेयक तरुण पिढीसाठी धोकादायक असताना त्यावर विरोधकांना चर्चा करायची होती. पण चर्चा न करता ही विधेयक मंजूर केल्याने विरोधी पक्ष सदस्यांनी अध्यक्षांना भेटून आपली नाराजी व्यक्त केली.
Also Read: महाड तालुक्यातील फार्म हाऊसवर बरबालांचा नाच ? पोलिसांचे दुर्लक्ष