महाराष्ट्र ताज्या बातम्या

Anant Gadgil: आत्मचरित्र लिहिण्यास बंदी म्हणजे विचारस्वातंत्र्याची गळचेपी, स्वातंत्र्यावर गदा : अनंत गाडगीळ

मुंबई: माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकातील एका संदर्भाचा संसदेत उल्लेख झाल्यानंतर केंद्र सरकार या मुद्द्यावर हादरलेले व गोंधळलेले दिसत आहे. परिणामी, सरकारी कर्मचारी तसेच सैन्यदलातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर किमान 20 वर्षे आत्मचरित्र किंवा आठवणी लिहिण्यास बंदी घालणारा कायदा केंद्र सरकार लवकरच आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिल्लीतील एका मोठ्या वृत्त समूहाने उघड केली आहे.

सदर वृत्त समूहानुसार, नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनुक्रमित विषय संपल्यानंतर या मुद्द्यावर अनौपचारिक चर्चा झाली होती.

आत्मचरित्र व आठवणी लिहिण्यावर बंदी घालणे म्हणजे थेट व्यक्तीच्या विचारस्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे असून ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे, अशी तीव्र टीका माजी आमदार व काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते Anant Gadgil यांनी केली आहे.

गाडगीळ म्हणाले की, भारतात सरकारी व सैन्यदलातील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय 60 वर्षे असून न्यायाधीशांचे निवृत्ती वय 62 ते 65 वर्षे आहे. अशा परिस्थितीत निवृत्तीनंतर किमान 20 वर्षांनंतरच आठवणी प्रसिद्ध करण्याची अट घातल्यास संबंधित व्यक्तींचे वय 80 ते 85 वर्षांपर्यंत जाईल. प्रत्यक्षात इतक्या वयापर्यंत पोहोचणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प असते.

ही बाब म्हणजेच आत्मचरित्रे व आठवणी प्रत्यक्षात कधीच प्रसिद्ध होऊ नयेत, या हीन आणि असंवेदनशील विचारसरणीचे प्रतिबिंब आहे. यामधून भाजपची दडपशाही वृत्ती स्पष्टपणे दिसून येते, असा टोला गाडगीळ यांनी लगावला.

असा कायदा आणण्यामागे भाजपप्रणित केंद्र सरकार जाणीवपूर्वक बचावात्मक भूमिका घेत असून सत्य बाहेर येऊ नये, यासाठीच हा प्रयत्न असल्याचेही गाडगीळ यांनी स्पष्ट केले.

Rajkaran Bureau

About Author

5 Comments

  1. Oren Hartinger

    February 20, 2026

    I appreciate, cause I found just what I was looking for. You’ve ended my four day long hunt! God Bless you man. Have a nice day. Bye

  2. GullyBet India

    February 20, 2026

    great points altogether, you simply gained a brand new reader. What would you suggest about your post that you made some days ago? Any positive?

  3. site link

    February 20, 2026

    Great wordpress blog here.. It’s hard to find quality writing like yours these days. I really appreciate people like you! take care

  4. gullybet live casino

    February 20, 2026

    I love it when people come together and share opinions, great blog, keep it up.

  5. Douglas Kaller

    February 20, 2026

    I’m not sure where you are getting your info, but great topic. I needs to spend some time learning much more or understanding more. Thanks for excellent information I was looking for this info for my mission.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात