ताज्या बातम्या

फडणवीस यांचा आवाका माहित आहे का ? आमदार प्रवीण दरेकर

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

तुम्ही तर घरात बसून मुख्यमंत्रीपद सांभाळले, देवेंद्र फडणवीस यांचा आवाका माहित आहे का? अशा खरमरीत शब्दात भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस हे मंत्रालयाच्या आसपासही फिरकण्याच्या कुवतीचे नाहीत’, असे म्हणत मराठा आरक्षणाच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोमवारी जहरी टीका केली होती. यावर दरेकर म्हणाले, फडणवीस यांच्या विषयीचा द्वेष आणि मत्सर उद्धव ठाकरेंच्या नसानसात भरलेला आहे. त्यामुळे ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात.

फडणवीस यांची क्षमता, त्यांचा आवाका, त्यांचे ज्ञान महाराष्ट्राला माहित आहे. उद्धव ठाकरेंची लायकीही महाराष्ट्राला माहित आहे. अडीच वर्ष जे मंत्रालयात गेले नाही, शासन समजून घेतले नाही, घर कोंबड्यासारखे मातोश्रीत बसून राहिले त्यांनी दुसऱ्यांची लायकी काढू नये, अशा परखड शब्दात दरेकर यांनी ठाकरे यांच्यावर पलटवार केला.

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधिमंडळातील किंवा संसदीय कारकीर्द पाहिल्यावर फडणवीस यांची क्षमता काय आहे हे लक्षात येईल. तुम्ही आत्ता कुठे विधान परिषदेवर आमदार म्हणून गेलेत. परंतु, फडणवीस हे बऱ्याच वेळेला विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आहेत, याची आठवणही दरेकर यांनी करून दिली.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
ताज्या बातम्या महाराष्ट्र

स्वतःचे आमदार निवडून आणायला शिका : राज ठाकरेंचा भाजपाला टोला

Twitter : @therajkaran पनवेल भारतीय जनता पक्षाने आपल्याला युतीची ऑफर दिली होती असा दावा करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज