महाराष्ट्र ताज्या बातम्या

Crop loss : महाराष्ट्रात ऑगस्ट–सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे ३० जिल्ह्यांत मोठे नुकसान

राज्यातील तब्बल १७.८५ लाख हेक्टर क्षेत्र बाधित; शेतकऱ्यांनी धैर्य सोडू नये – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे मुंबई: “ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यांतील पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांचे पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळेल. शेतकऱ्यांनी खचून न जाता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad : महाडच्या उत्पादन शुल्क कार्यालयाला टाळे – अधिकारी कुठे गायब?

पोस्टमनलाही दरवाजाखालून टपाल टाकावे लागले! महाड : महाड तालुक्यात गावोगावी अवैध दारू विक्रीचा पूर उसळला असताना, यावर कारवाई करणे तर दूरच, महाड शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला आज अक्षरशः टाळे लागलेले आढळले. इतकेच नव्हे तर शासकीय टपाल घेऊन आलेल्या पोस्टमनलाही बुचकळ्यात पडत दरवाजा खालून पत्रे ढकलून जावे लागले. महाड तालुका हा ऐतिहासिक वारसा लाभलेला […]

महाराष्ट्र अन्य बातम्या

Local Body Elections : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता जानेवारी २०२६ मध्ये!

सर्वोच्च न्यायालयाकडून मुदतवाढ, अजून पाच महिने प्रशासकीय राजवट कायम By Milind Mane मुंबई : मागील पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा एकदा गंडांतर आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज सुनावणीदरम्यान राज्य सरकारला आणि निवडणूक आयोगाला दिलासा देत ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुका पूर्ण करण्याची मुदतवाढ दिली आहे. यामुळे महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अभिनव आवाहनाला उदंड प्रतिसाद

वाढदिवसानिमित्त जमा झाले तब्बल २५ हजारांहून अधिक शैक्षणिक साहित्य By राजू झनके मुंबई: विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या आगळ्या-वेगळ्या आवाहनाला समाजाच्या सर्व स्तरांतून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. शुभेच्छा देताना हार, पुष्पगुच्छ, केक वा इतर भेटवस्तू न आणता, गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, पेन, पेन्सिल यांसारखे शैक्षणिक साहित्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले होते. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Fake Kunbi Certificate: बोगस कुणबी प्रमाणपत्रांना सरकारचा आळा – बावनकुळे यांचा इशारा!

”खोट्या कागदपत्रांवर कुणालाही ओबीसी हक्क नाही” – मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्धार मुंबई : राज्यात बोगस कुणबी आणि ओबीसी प्रमाणपत्रांच्या ‘उद्योगावर’ आता सरकारने झडप घालण्याचा निर्धार केला आहे. “प्रमाणपत्र देण्याआधी एकेका कागदाची फाईल उलथून-पुलथून पाहिली जाईल. खोटं प्रतिज्ञापत्र दिलं तरी कुणालाही ओबीसी बनता येणार नाही,” असा थेट इशारा महसूलमंत्री आणि ओबीसी विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Dr Babasaheb Ambedkar : मनमाड प्रेरणाभूमीच्या धरणे आंदोलनाला इंदू मिल संघर्ष समितीचा पाठिंबा

मनमाड (ता. नांदगाव, जि. नाशिक) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने आणि कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम या ऐतिहासिक वास्तूला “प्रेरणाभूमी”चा दर्जा मिळावा, तसेच १७ नोव्हेंबर हा दिवस “प्रेरणादिन” म्हणून शासनमान्यता मिळावी, या मागणीसाठी मनमाड येथे लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनाचे नेतृत्व प्रा. डॉ. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

प्रबोधनकार ठाकरे वाचनालय वाचवणे आणि वाढवणे महत्त्वाचे; पत्रकार भवन निर्मिती हीच विजय वैद्य यांना खरी आदरांजली

मुंबई : जय महाराष्ट्र नगर, बोरीवली (पूर्व) येथील कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालय/वाचनालय वाचवून ते टिकवणे आणि पुढे वाढवणे हेच काळाचे मोठे आव्हान असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. तसेच, उत्तर मुंबई पत्रकार संघामध्ये पत्रकारांची एकजूट अबाधित ठेवून पत्रकार भवनाची निर्मिती करणे हीच ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व समाजसेवक विजय वैद्य यांना खरी आदरांजली ठरेल, असेही मान्यवरांनी नमूद […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

BJP’s political game : दापोलीत भाजपाची नवी खेळी : वैभव खेडेकरांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला हादरा?

मुंबई : खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि मनसेचे कोकणातील प्रभावी नेते वैभव खेडेकर हे २३ सप्टेंबर रोजी भाजपा प्रवेश करणार असून, या प्रवेशाने दापोली मतदारसंघातील राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीतच नव्हे तर भविष्यातील विधानसभा समीकरणातही या प्रवेशामुळे शिंदे गटात धाकधूक वाढली आहे. प्रदेशाध्यक्षपदी कोकणचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांची वर्णी लागल्यानंतर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विजय वैद्य यांना अभिवादन : बोरीवली–ठाणे भूयारी मार्गाला विजय वैद्य व धर्मवीर आनंद दिघे यांची नावे देण्याची मागणी

मुंबई : बोरिवली पूर्व–पश्चिम द्रुतगती महामार्गापासून ठाण्यापर्यंत उभारल्या जाणाऱ्या भूयारी मार्गाला ठाण्याकडील बाजूला धर्मवीर आनंद दिघे आणि बोरीवलीकडील बाजूला ज्येष्ठ राजकीय विश्लेषक व समाजसेवक दिवंगत विजय वैद्य यांची नावे द्यावीत, अशी भावनिक मागणी त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित आदरांजली सभेत करण्यात आली. मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै. प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयात, अध्यक्ष नंदकुमार मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Pakistan Cricket : शहिदांचा अपमान! पाकिस्तानसोबत क्रिकेट म्हणजे मोदी सरकारचा देशद्रोह – पुण्यात आम आदमी पक्षाचा संतप्त आवाज, पाकिस्तानी क्रिकेटचा टी-शर्ट जाळून निषेध

पुणे : देशभरात पाकिस्तानविरोधी संताप असताना मोदी सरकार मात्र पाकिस्तानी क्रिकेटसमोर गुडघे टेकते आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने आज पुण्यात केला. येत्या १४ सप्टेंबर रोजी दुबईत होणाऱ्या भारत–पाक सामना रद्द करण्याची मागणी करत शिवाजीनगर मेट्रो चौकात संतप्त कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी क्रिकेटचा टी-शर्ट जाळून तीव्र निषेध व्यक्त केला. काही महिन्यांपूर्वी जम्मू–काश्मीरमधील पहलगाम घाटी दहशतीने थरारली होती. […]