BMC : मनपा कडून मंत्रालयाला ‘नो वॉटर सप्लाय’ – व्हीआयपींना धक्का
मुंबई – “मंत्रालयालाच पाण्याचा पुरवठा बंद झाला तर मग सामान्य मुंबईकरांनी काय अपेक्षा ठेवायची?” – शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजता मंत्रालय व आसपासच्या शासकीय इमारतींचा पाणीपुरवठा अचानक बंद झाला आणि गोंधळ उडाला. मंत्रालयाच्या सुरक्षेवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह, आमदार निवासातील कर्मचारी व कार्यकर्त्यांची अक्षरशः तारांबळ उडाली. मंत्रालय व विधानभवन परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार भूमिगत वाहिन्यांपैकी एक वाहिनी […]