Ganesh Chaturthi : अठराव्या वर्षीही खड्ड्यांतूनच गणेशोत्सवाचा प्रवास! रायगडमध्ये वाहतूक सेनेचा १५ ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम
महाड –कोकणातील गणेशोत्सव अवघ्या ३० दिवसांवर येऊन ठेपला असतानाही मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६वरील खड्डे आणि वाहतूक कोंडी कोकणवासीयांची डोकेदुखी ठरली आहे. रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था आणि रखडलेली कामे १५ ऑगस्टपर्यंत न सुधारल्यास ‘चक्काजाम’ आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला आहे. महामार्गाचे काम १८ वर्षांपासून सुरू असूनही अजूनही पूर्ण […]