महाराष्ट्र ताज्या बातम्या

Chandrashekhar Bawankule : “यापुढे फेसॲपवर हजेरी नाही… तर पगारही नाही!” – महसूलमंत्री बावनकुळे यांचा कडक इशारा

मुंबई – राज्यातील महसूल यंत्रणेत शिस्त आणण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी कडक पवित्रा घेतला. “ज्या अधिकाऱ्यांनी फेसॲपवर उपस्थिती नोंदवली नाही, त्यांचा पगार थांबवण्यात येईल. ज्या दिवशी हजेरी नसेल, त्या दिवशी गैरहजर मानलं जाईल,” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. या नव्या आदेशानुसार तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी ते जिल्हाधिकारी यांच्यासाठी फेसॲपवर दररोज हजेरी अनिवार्य […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Marathi – Hindi Language Row : “पटक पटक के मारूंगा” म्हणणाऱ्या दुबेंना संसदेत प्रत्युत्तर; तिघी महिला खासदारांचा मनसेकडून सन्मान

मुंबई – “पटक पटक के मारूंगा” अशी मराठी माणसाला दिलेली धमकी अद्याप विसरलेली नाही आणि त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी संसदेत महाराष्ट्राच्या तिघी महिला खासदारांनी ‘जय महाराष्ट्र’चा नारा देत मराठी स्वाभिमानाची मशाल पेटवत भाजप खासदार निशिकांत दुबे यांना चोख प्रत्युत्तर दिलं. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव या तीन महिला खासदारांनी घेतलेल्या या रोखठोक भूमिकेचं […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Eknath Shinde : संत साहित्य १४ भाषांमध्ये पोहोचवणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वा

पंढरपूर – संत नामदेव महाराजांनी मराठीला अडीच हजार अभंगांची देणगी दिली. हे संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. श्रीक्षेत्र पंढरपूर येथील संत नामदेव महाराज जन्मस्थान वाड्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांना संतशिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिंदे म्हणाले, “हे स्थान म्हणजे चालते-बोलते […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Pune : पुणे ग्रोथ हब होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : पुणे महानगर प्रदेशाला (PMR) तंत्रज्ञान, उत्पादन, शिक्षण आणि हरित गतिशीलतेमध्ये आघाडीवर नेण्यासाठी ते ग्रोथ हब म्हणून विकसित केले जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या संदर्भात नियोजनाचा आराखडा यशदा तयार करणार असून पुणे महानगर विकास प्राधिकरण यासाठी निधीची तरतूद करणार आहे. मंत्रालयात नीती आयोगाच्या सूचनेनुसार झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mahad MIDC: पोलिसांची अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई; ₹88.92 कोटींचा केटामाईन जप्त

महाड – महाड औद्योगिक वसाहतीतील रोहन केमिकल्स या कंपनीवर महाड एमआयडीसी पोलिस आणि अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (NCB) यांच्या संयुक्त कारवाईतून तब्बल ₹88.92 कोटी किंमतीचा केटामाईन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने संपूर्ण औद्योगिक वसाहतीत खळबळ उडाली असून अजूनही काही कंपन्या तपासाच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपा युती सरकारने महाराष्ट्राचा तमाशा बनवला आहे! — हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात

मुंबई –“महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या राजकीय द्रष्ट्या नेतृत्वाची परंपरा लाभली आहे. परंतु गेल्या दहा वर्षांपासून भाजपा युती सरकारने महाराष्ट्राच्या राजकारणाचा अक्षरशः तमाशा बनवला आहे. विधीमंडळाच्या आत पत्याचा क्लब तर बाहेर WWFचा आखाडा सुरू आहे. या सर्व गोंधळाचा प्रमुख सूत्रधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत,” अशा कठोर शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महाड-दापोली राज्य मार्गावर एसटी बस अपघात; चालक-वाहकासह आठ प्रवासी जखमी

महाड: महाड-दापोली राज्य मार्गावर मांडवकर-कोंड गावाजवळ पुणे फौजी अंबवडे (अहिरे कोंड) एसटी बसला अपघात होऊन बस रस्त्यावरून घसरली. या अपघातात चालक व महिला वाहकासह एकूण आठ प्रवासी गंभीर जखमी झाले असून, सर्व जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात आज दुपारी सुमारे दोनच्या सुमारास घडला. बस क्रमांक MH-07-C-9043 ही पिंपरी-चिंचवड आगाराची असून, ती […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

अखिल भारतीय किसान सभेकडून कॉम्रेड व्ही. एस. अच्युतानंदन यांना लाल ध्वज झुकवून श्रद्धांजली

मुंबई: स्वातंत्र्यसैनिक, केरळचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ मार्क्सवादी नेते कॉम्रेड व्ही. एस. अच्युतानंदन यांच्या निधनाबद्दल अखिल भारतीय किसान सभेने (AIKS) तीव्र शोक व्यक्त केला आहे. १०१ वर्षीय अच्युतानंदन हे भारतीय शेतकरी चळवळीचे एक प्रेरणास्थान होते. त्यांना लाल ध्वज झुकवून अखेरची मानवंदना अर्पण करण्यात आली. AIKS अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे आणि सरचिटणीस विजू कृष्णन यांनी दिलेल्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडप परवानगीसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू; अनिल गलगली यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई: महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक श्रीगणेशोत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिल्यानंतर, मुंबई महानगरपालिकेनेही उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या पाठपुराव्याला यश मिळत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ऑनलाईन मंडप परवानगी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अनिल गलगली यांनी ४ जुलै २०२५ रोजी पालिकेचे उप आयुक्त प्रशांत सपकाळे यांना पत्र लिहून विनंती केली होती की, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

विधानभवनातील गोंधळ रोखणाऱ्या सुरक्षारक्षकांचा सभापती राम शिंदे यांनी केला गौरव

मुंबई : विधीमंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळाच्या वेळी प्रसंगावधान राखून वेळीच हस्तक्षेप करणाऱ्या सुरक्षारक्षकांची विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी बुधवारी विशेष प्रशंसा केली. सभापतींनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारल्याने सुरक्षा विभागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिवेशन संपण्याच्या दोन दिवस आधी विधानभवनाच्या लॉबीच्या बाहेरच भाजपा आमदार […]