विश्लेषण ताज्या बातम्या राष्ट्रीय

धक्कादायक सर्वे : भाजपला देश पातळीवर आणि महाराष्ट्रात “इतक्या” जागा गमवाव्या लागतील?

Twitter: @vivekbhavsar मुंबई: भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बौद्धिक संस्था म्हणून गणल्या जाणाऱ्या “प्रबोधिनी”ने केलेला सर्वे आणि “संघा”ने देशभरातील एकेक जागेचा घेतलेला आढावा या मंथनातून निघालेले निष्कर्ष भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत धक्कादायक आहेत. या अभ्यास आणि सर्वेतून भाजपाला येत्या लोकसभा निवडणुकीत 100 पेक्षा जास्त जागांचा फटका बसणार आहे तर महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे यांच्या […]

महाराष्ट्र

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा संभाजीनगरात मंत्रिमंडळ बैठकीवर धडक मोर्चा

Twitter : @therajkaran परभणी  दुष्काळग्रस्त जनतेच्या मागण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने दि १५ सप्टेंबर रोजी, शुक्रवारी औरंगाबाद (संभाजीनगर) येथे थेट महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीवर धडक सत्याग्रहाचे आयोजन केले आहे. नाशिक पट्ट्यातील धरणे 85% पेक्षा जास्त भरलेली असताना दुष्काळामुळे जायकवाडी प्रकल्पात अल्प पाणी आहे. महाराष्ट्र शासन अशास्त्रीय दुष्काळ संहिता राबवीत असल्याने पीकविमा कंपन्यांच्या फायद्यासाठी महाराष्ट्र सरकार दुष्काळ घोषित करण्यास टाळाटाळ करीत आहे, […]

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जग जिंकले : मुख्यमंत्री

Twitter : मुंबई जी-२० परिषदेच्या निमित्ताने जगाच्या विविध देशांचे प्रमुख शनिवारी राजधानी दिल्लीमध्ये अवतरले, आणि त्यांनी पंतप्रधानांनी मांडलेला ‘दिल्ली जाहीरनामा’ टाळ्या व बाके वाजवून स्वीकारणे हे एक मोठे राजनैतिक यश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्ताने जग जिंकल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी आपल्या ट्विटर वरून केला. हा एक सुवर्ण दिन होता. देशाचे पंतप्रधान […]

राष्ट्रीय

जी-20 च्या माध्यमातून उपेक्षितांना विस्थापित करण्याचा डाव; वुई -20 समूहाचा गंभीर आरोप

Twitter : @therajkaran मुंबई : भारत जी-२० चे यजमानपद भूषवत आहे, यातून श्रीमंत जी-७ राष्ट्रांचा प्रभाव वाढला आहे. मात्र भारतातील ज्या -ज्या भागात ज्या – ज्या वेळी जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्या – त्या वेळी त्या भागातील बहुतांश उपक्षित वर्गांना आणि शोषितांना विस्थापित होण्यास भाग पडले आहे. या उपेक्षित आणि शोषित वर्गाचे म्हणणे मांडण्यासाठी […]

विश्लेषण

शिशिर धारकरांच्या सेना प्रवेशामुळे पेण विधानसभा मतदारसंघात भगवा फडकणार?

Twitter : @milindmane70 मुंबई रायगड जिल्ह्यातील पेण चे माजी नगराध्यक्ष आणि पेण अर्बन बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी शिशिर धारकर यांनी ऑगस्ट च्या शेवटच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात प्रवेश केला (Shishir Dharkar joins UBT Shiv Sena). बँक घोटाळ्यातील आरोपीला उद्धव ठाकरे यांनी पक्षात प्रवेश दिल्याने राजकीय क्षेत्रात अनेकांच्या […]

मुंबई

भाजपकडून गोविंदांना १० लाखाचे विमा कवच

Twitter : @NalavadeAnant मुंबईमहायुती सरकारच्या काळात दणक्यात हिंदू सण साजरे होत असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई भाजपातर्फे ४०० हून अधिक ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील जांबोरी मैदानातून परिवर्तनाची दहीहंडी सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. त्याचबरोबर मुंबई भाजपाकडून ४५० मंडळांच्या २५ हजार गोविंदांना १० लाखाचे विमा कवच देण्यात आले आहे. मुंबईतील भाजप नेते […]

महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली – नाना पटोले

Twitter : @therajkaran मुंबईमराठा समाजाच्या आरक्षणासाठी जालना जिल्ह्यात शांततेने आंदोलन सुरु असताना शुक्रवारी पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. पोलीसांनी निर्दयीपणे मारहाण केली, लोकांची डोकी फोडली. मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु होती, त्याला देशभर प्रसिद्धी मिळत होती. त्यावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी हा प्रकार जाणीवपूर्वक केला आहे. फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

महाराष्ट्र

कुणबी दाखल्यांचा वाद : निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याकरिता कार्यपद्धती निश्चितीसाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जारंगे – पाटील यांनी ‘निजामकालीन महसुली रेकॉर्ड तपासून याठिकाणी पूर्वी जे कुणबी म्हणून नोंदणीकृत होते त्यांना मान्यता’ देण्याची मागणी केली आहे. त्या अनुषंगाने […]

महाराष्ट्र

सहकारी साखर कारखान्यांना शिखर बँकेकडून कर्ज; शासन घेणार हमी

Twitter : @therajkaran मुंबई आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करणार. हे कर्ज अटी आणि शर्तींच्या अधीन राहून उपलब्ध करून देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या योजनेच्या अनुषंगाने सहकारी साखर कारखान्यांना त्यांच्या फेस व्हॅल्युनुसार कर्ज व तारणाचे प्रमाण १ : […]

ताज्या बातम्या महाराष्ट्र

‘सारथी’ संदर्भातील मुख्यमंत्र्यांचे विधान फसवणूक करणारे – काँग्रेसचा आरोप

Twitter : @NalavadeAnant मुंबई मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे ही राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची अपेक्षा आहे. सत्ताधारी पक्षही तीच भाषा बोलतो, पण कृती मात्र काहीच करत नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर सध्या असलेली ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादा काढावी लागेल. बिहार, तामिळनाडू, कर्नाटकसह इतर काही राज्यात आरक्षणाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, मग […]