हिंदी सक्तीचा निर्णय मागे; त्रिभाषा धोरणासाठी नवी समिती – मुख्यमंत्री फडणवीस
मराठी माणसाच्या भावना लक्षात घेऊन निर्णय; राजकारण नको – उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई – राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीच्या निर्णयाला जनतेतून तीव्र विरोध होत असताना, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून यासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात येत आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली. त्रिभाषा सूत्रांसंदर्भातील धोरण निश्चित करण्यासाठी डॉ. नरेंद्र जाधव […]