महाराष्ट्र ताज्या बातम्या

“मराठीचा गळा घोटू देणार नाही” — काँग्रेसचा भाजपला इशारा

मुंबई – महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याचा निर्णय हा मराठी विरोधी असून, तो त्वरित रद्द न केल्यास काँग्रेस पक्ष सडकून विरोध करेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. शनिवारी मुंबईतील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ म्हणाले, “भाजप आणि संघाचा हेतू म्हणजे संविधानातील आठव्या अनुसूचीतील सर्व भाषांचा अस्त करून […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री रविंद्र चव्हाण हेच होणार!

१ जुलै रोजी होणार घोषणा? मुंबई : अखेर महाराष्ट्र प्रदेश भाजपला शेवटी नवीन प्रदेशाध्यक्ष मिळालाच. एखादी निवडणूक कशी लढवून जिंकायची याचे काटेकोर नियोजन करण्यात ज्यांचा हात कोणी धरू शकत नाहीत असे भाजपचे विद्यमान प्रदेश कार्यकारी अध्यक्ष व माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या नावावर पक्षातील बहुतांश नेत्यांचे व पदाधिकाऱ्यांचे एकमत झाले आहे. त्यामुळे त्यांच्या नेमणुकीवर येत्या […]

राष्ट्रीय ताज्या बातम्या

Varanasi: वाराणसीत वेद, योग, पर्यावरण, औषधी वनस्पती व वास्तुशास्त्राचे प्रशिक्षण उपलब्ध होणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाराणसी (उत्तर प्रदेश) : “वेदांमध्ये आद्यस्थानी वसलेल्या ईश्वरास माझे वंदन आहे” — संत ज्ञानेश्वरांनी व्यक्त केलेल्या या भक्तिभावनेचा अनुभव आज मला येथे येऊन प्रत्यक्ष मिळाला, असे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ते श्री धर्मसंघ मणी मंदिर, दुर्गाकुंड येथे उभारण्यात आलेल्या शास्त्र संग्रहालय आणि अनुसंधान केंद्राच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यावेळी उत्तर प्रदेशचे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

महामार्गावर भीषण अपघात – २५ जनावरांचा मृत्यू, ग्रामस्थांचे तीव्र आंदोलन; आमदार आशीषराव देशमुख यांनी घेतली तत्काळ दखल

नागपूर: छत्रापुर गावाजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या एका मोठ्या कंटेनरने महामार्गावर असलेल्या २५ जनावरांना चिरडले. या भीषण अपघातात सर्व जनावरे जागीच मृत्युमुखी पडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वीही असे […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

समांतर वीज वितरण परवाना असंविधानिक व बेकायदेशीर – महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा तीव्र विरोध

नागपूर : ग्राहक हिताचा खोटा आव आणत, देशातील प्रथम क्रमांकाची व आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची महावितरण कंपनी नष्ट करण्याचा महाराष्ट्र शासनाचा डाव सुरू झाला आहे. राज्य शासनाने विद्युत कायदा-2003 मधील असंविधानिक तरतुदींचा आधार घेत, तसेच राज्य वीज नियामक आयोगाचा वापर करून, महावितरण कंपनीला मिळणारा प्रमुख शहरी क्षेत्रातील महसूल अदानी, टोरेंट आणि टाटा अशा खासगी कंपन्यांच्या […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

…. आणि शिवसेना नेत्यांनीच आपल्याच मंत्र्यांचे कान उपटले

मुंबई : शालेय शिक्षणात पहिलीपासून लहान मुलांना हिंदी ही तिसरी भाषा शिकवण्याच्या व त्रिभाषा सूत्र स्वीकारण्यावर हट्टी भूमिका घेण्यावर ठाम असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे शुक्रवारी येथे त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार व कामगार नेते किरण पावसकर यांनी संतप्तपणे खडे बोल सुनावत चांगलेच कान उपटले. आज त्यांनी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कोल्हापूर चित्रनगरीत २८ जून रोजी पोस्ट-प्रोडक्शन स्टुडिओचे भूमिपूजन

कोल्हापूर: गेल्या तीन वर्षांमध्ये कोल्हापूर चित्रनगरीत करण्यात आलेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण, तसेच आधुनिक पोस्ट-प्रोडक्शन स्टुडिओच्या भूमिपूजनाचा सोहळा दि. २८ जून रोजी सकाळी ११:५० वाजता सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

NEP अहवालावर भाजपाची अर्धवट भूमिका; उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करत मराठी जनतेची दिशाभूल – हर्षल प्रधान यांचा भाजपवर निशाणा

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)चे नेते व प्रवक्ते हर्षल प्रधान यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 संदर्भात भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2020 मध्ये NEP अंमलबजावणीसाठी 19 सदस्यीय टास्क फोर्स स्थापन करण्यात आली होती. शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने अहवाल तयार केला […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

त्रिभाषा धोरणावरून भाजपचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; आंदोलन म्हणजे ढोंग – नवनाथ बन

मुंबई: त्रिभाषा धोरणाविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा गट) मोर्चा काढत असतानाच भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी हे आंदोलन ढोंगी असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार असल्याचा आरोप केला आहे. ट्विट करताना बन म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना, फेब्रुवारी २०२२ मध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या (NEP) टास्क फोर्सचा अहवाल […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सर्वांना मोठी पदे मिळतीलच असे नाही, छोटी पदं घेऊन कामाचा आवाका दाखवा!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पक्ष नेत्यांना स्पष्ट संदेश मुंबई : “सर्वांना मोठी पदं मिळतीलच असं नाही, पण लहान पदं घेऊनही कामाचा आवाका सिद्ध करता येतो. पक्षात मिळूनमिसळून काम करावं,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना व नेत्यांना स्पष्ट आणि ठाम संदेश दिला. हडपसर येथील उद्धव ठाकरे […]