महाराष्ट्र ताज्या बातम्या

आता वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘चरणसेवा’…!

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा अभिनव उपक्रम मुंबई: आषाढी वारीच्या निमित्ताने लाखो वारकरी पंढरपूरच्या विठोबाच्या दर्शनासाठी पायी वारी करत असतात. त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि दूरदृष्टीतून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातर्फे ‘चरणसेवा’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यातील नाशिक, जालना, सातारा, सोलापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांतून निघणाऱ्या पालख्यांमध्ये सहभागी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

पूर नियंत्रणाच्या उपाययोजना करुन पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करावीत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: राज्यात अनेक नद्यांच्या किनारी अनेक वर्षांमध्ये पूर आलेला नाही. तथापि पूर नियंत्रण रेषेमुळे विकासाला मर्यादा येत आहेत. सर्व नदीकिनारी पूर नियंत्रणाच्या उपाययोजना करुन पूर रेषेबाबतची मार्गदर्शक तत्वे पुन्हा निश्चित करावीत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

By योगेश त्रिवेदी मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना मागाठाणे शाखा क्रमांक १२ तर्फे युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विभागातील सर्व ३१ अंगणवाड्यांमधील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच प्रत्येक अंगणवाड्यांना सतरंजी देण्यात आल्या. या उपक्रमांमुळे स्थानिक स्तरावर […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सोमवारपासून राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात

‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून होणार विद्यार्थ्यांचे स्वागत मुंबई: पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात विदर्भ वगळता इतर सर्व विभागांत सोमवार दि. 16 जून रोजी तर विदर्भात सोमवार दि. 23 जून 2025 पासून होणार आहे. शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी ‘शाळा प्रवेशोत्सवा’च्या माध्यमातून मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

भारतीय निवडणूक कायद्यांनुसार मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही – मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य

मुंबई: भारतीय निवडणूक कायद्यांनुसार, मतदारांची नावे केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही. लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० व मतदार नोंदणी नियम, १९६० नुसार, मतदारयादी मतदानकेंद्रनिहाय तयार करण्यात येते. राज्यभरातील २८८ मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी (EROs) ही यादी जवळपास एक लाख मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLOs) यांच्या मदतीने क्षेत्रीय पडताळणी करून तयार केली. या प्रक्रियेत सर्व मान्यताप्राप्त राजकीय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

कल्याणच्या त्या रखडलेल्या म्हाडा प्रकल्पावर थेट कारवाई करा: गृहनिर्माण राज्यमंत्र्यांचे म्हाडाला निर्देश

मुंबई: कल्याण पश्चिममधील १४ वर्षांपासून रखडलेल्या म्हाडा पुनर्विकास प्रकल्पाच्या पुन्हा सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले असून फसवणूक करणाऱ्या विकासकांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश गुरुवारी गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी येथे म्हाडाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिले. कल्याणचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने आज गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ.भोयर यांच्या मंत्रालयातील दालनात यासंदर्भात एक बैठक […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

डोंगरावरील झोपडपट्ट्यांसाठी स्वतंत्र धोरण तयार करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला महत्त्वपूर्ण निर्देश

मुंबई: पावसाळ्याच्या तोंडावर मुंबई उपनगर व राज्याच्या विविध भागातील डोंगरावरील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याने गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत डोंगरावरच्या झोपडपट्ट्यांसाठी स्वतंत्र पुनर्वसन धोरण तयार करण्याचे सुस्पष्ट व महत्त्वपूर्ण निर्देश प्रशासनाला दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, “डोंगरावरील झोपडपट्ट्यावर वारंवार दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

एमएमआरडीएने उघड केला एल अँड टीचा खोटा दावा; Rs 12,000 कोटींच्या निविदा वादावर सुप्रीम कोर्टाने दिला नव्या निविदेचा आदेश — सार्वजनिक हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

X : @vivekbhavsar मुंबई: सार्वजनिक हित आणि पारदर्शकतेसाठी महत्त्वाचा निर्णय घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) बांधकाम क्षेत्रातील दिग्गज कंपनी लार्सन अँड टुब्रो (L&T) ला गाईमुख–भायंदर बोगदा व उन्नत रस्ता प्रकल्पासाठी सादर केलेल्या मूळ वित्तीय अंदाजपत्रकांची अधिकृत प्रत मागवली आहे. ₹12,000 कोटींच्या वादग्रस्त निविदेसंदर्भातील हा खटला उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात एल अँड टीने […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

सिनेमा, मालिका चित्रीकरणासाठी साताऱ्यासाठी प्रोत्साहन धोरण आणणार

सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांची घोषणा सातारा: सातारा जिल्हा आणि परिसर हा सिनेमा, मालिकांच्या चित्रीकरणासाठी अत्यंत पोषक असून त्यासाठी धोरण तयार करण्यात येईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांनी आज येथे केली. संघटनात्मक प्रवास आणि सांस्कृतिक कार्य विभाग आयोजित शाहिरी महोत्सवाच्या समारोपासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड आशिष शेलार आज सातारा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

खासगी क्षेत्रानेही लोकलवरील ताण कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री

X: @vivekbhavsar मुंबई: मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबईतील लोकलसेवा आणि प्रवासी सुरक्षेच्या प्रश्नांकडे पुन्हा एकदा गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. कार्यालये एकाच वेळेस सुरू होत असल्याने सकाळी आणि संध्याकाळी लोकल सेवांवर प्रचंड ताण येतो. या पार्श्वभूमीवर गर्दी नियंत्रणासाठी कार्यालयीन वेळांचे व्यवस्थापन करणे ही एक महत्त्वाची आणि दीर्घकालीन उपाययोजना ठरू शकते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]