महाराष्ट्र ताज्या बातम्या

e-Bond Revolution: महाराष्ट्रात ‘ई-बॉन्ड’ क्रांती: व्यवसाय सुलभतेत मोठे पाऊल; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्वाकांक्षी निर्णय

मुंबई – महाराष्ट्रातील व्यापार व उद्योग जगताला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने आयात-निर्यात व्यवसायातील पारंपरिक कागदी बॉन्ड (मुद्रांक) रद्द करून ‘ई-बॉन्ड’ प्रणाली सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात याची घोषणा केली. बावनकुळे म्हणाले की, “ई-बॉन्ड” सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील सोळावे राज्य ठरले आहे. आजपासून आयात-निर्यात व्यवहारासाठी वापरले […]

महाराष्ट्र अन्य बातम्या ताज्या बातम्या विश्लेषण शोध बातमी

महाराष्ट्र अडकला वर्ल्ड बँक कर्जाच्या सापळ्यात : राजकीय जबाबदारी कोण घेणार?

भाग १२ प्रस्तावना : प्रकल्प संपला, पण कर्ज कायम जून 2024 मध्ये वर्ल्ड बँकेने अधिकृतरीत्या पोक्रा – महाराष्ट्र प्रकल्प (Maharashtra Project on Climate Resilient Agriculture) बंद केला. बँकेच्या कागदोपत्री सर्व अहवालांमध्ये हा प्रकल्प “सॅटिस्फॅक्टरी” म्हणजे समाधानकारक ठरला. लाखो शेतकरी प्रकल्पात सामील झाले, महिलांच्या उत्पन्नात वाढ झाली, हरितगृह वायू उत्सर्जन कमी झाले अशी चमकदार आकडेवारी मांडली […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Mithi River tender scam: मिठी नदी स्वच्छतेच्या निविदा प्रक्रियेत केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन – सचिन सावंत यांचा पुनरुच्चार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेने मिठी नदी स्वच्छतेच्या निविदा प्रक्रियेवर केलेले स्पष्टीकरण म्हणजेच या संपूर्ण प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याची कबुली असल्याचा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज केला. केंद्रीय दक्षता आयोगाच्या (CVC) स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करून स्पर्धा मर्यादित करण्याचा प्रयत्न झाल्याचा त्यांचा ठपका आहे. सावंत यांनी सांगितले की, मूळ निविदेत पंप उत्पादक कंपनीसाठी […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : शासकीय नोकरीतील अनुकंपाचा अनुशेष संपवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस सरसावले!

मुंबई : राज्य शासनातील वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लावण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्यानंतर आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या शुक्रवारी, ४ ऑक्टोबर रोजी तब्बल ५१८७ अनुकंपा उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे प्रदान केली जाणार आहेत. त्याच दिवशी ५१२२ एमपीएससी उमेदवारांनाही प्रमाणपत्रे देण्यात येणार असून, एका दिवसात तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Redevelopment: जुन्या चाळींच्या पुनर्विकासासाठी पत्रकार संघात मोफत कार्यशाळा

मुंबई : मुंबईतील जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई मराठी पत्रकार संघ आणि एच. डी. गावकर सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या चाळी व गृहनिर्माण सोसायट्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेवर मार्गदर्शन करणारी मोफत कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा शनिवार, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं. ४.३० वाजता आझाद मैदानाजवळील पत्रकार […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

Congress: अखेर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार!

मुंबई : राज्यभरात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असताना सरकारकडून अजूनही मदतीची घोषणा न झाल्याने काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. “शेतकऱ्यांना वा-यावर सोडणाऱ्या महाभ्रष्ट महायुती सरकारविरोधात” शुक्रवार, ३ ऑक्टोबरपासून राज्यभर रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा आज प्रदेश काँग्रेसने केली. गेल्या महिनाभरात राज्यातील १०० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील शेती, फळबागा आणि पिकांचे नुकसान झाले आहे. […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे एसटीची १० टक्के भाडेवाढ रद्द- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : राज्यातील पूरस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिली. शिंदे म्हणाले, “एसटी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात साधारण १० टक्के भाडेवाढ करते आणि त्यातून सुमारे ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूरस्थिती पाहता, या वर्षी […]

ताज्या बातम्या मुंबई

मुंबई महापालिकेतून अभियंते गायब होणार?

By सचिन व्ही यु सहाय्यक आयुक्त पदांवर एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांचा वर्चस्व मुंबई : दसऱ्यानंतर मुंबई महापालिकेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण सातही उमेदवारांची नियुक्ती सहाय्यक आयुक्त पदी होत आहे. त्यामुळे केवळ एक-दोनच कार्यकारी अभियंते सहाय्यक आयुक्त पदी उरणार असून, अभियंत्यांचा वार्ड प्रशासनातील सहभाग जवळपास संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महापालिकेचा शंभर वर्षांचा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

BMC Tender scam : मुंबई महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत नियमभंग?

काँग्रेसचे सचिन सावंत यांचा गंभीर आरोप – केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांची पायमल्ली मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निविदा प्रक्रियेत सातत्याने अनियमितता होत असून, केंद्रीय दक्षता आयोगाच्या (CVC) मार्गदर्शक तत्त्वांचे उघड उल्लंघन केले जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. आयुक्त भूषण गगराणी यांना पाठवलेल्या ताज्या पत्रातून सावंत यांनी हा मुद्दा […]

महाराष्ट्र ताज्या बातम्या

बीआयटी चाळींचा पुनर्विकास निविदा प्रक्रियेद्वारे शक्य

राज्य शासनाच्या मान्यतेनंतर मुंबई महापालिकेकडून विकासकांची नेमणूक करता येणार By Sachiv V V मुंबई : बीआयटी चाळींचा पुनर्विकास रखडला असल्यास संबंधित सोसायटी व रहिवाशांनी राज्य शासनाकडे दाद मागावी. त्यानंतर मुंबई महापालिकेकडून निविदा प्रक्रिया राबवून पुनर्विकास प्रकल्प हाती घेता येईल, अशी माहिती महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडत आहेत. […]