मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवनात राज्य विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी ३ मार्च ते २६ मार्च २०२५ असणार असल्याचे निश्चित करण्यात आले. तसेच १० मार्च रोजी राज्य सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.
या बैठकीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपसभापती नीलम गोरे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अधिवेशनाचे कामकाज आणि ठरवलेला कार्यक्रम
✅ ३ मार्च २०२५
• राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवणे
• राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दल आभार प्रस्ताव
• सन २०२४-२५ च्या पुरवणी मागण्या सादर करणे
• शोक प्रस्ताव
✅ १० मार्च २०२५
• २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर (दुपारी २.०० वा.)
✅ ११-१२ मार्च २०२५
• अर्थसंकल्पावर सर्वसाधारण चर्चा
✅ १३-२० मार्च २०२५
• अर्थसंकल्पीय मागण्यांवर चर्चा व मतदान
• २० मार्च रोजी विनियोजन विधेयक मांडले जाईल
✅ २४-२५ मार्च २०२५
• भारतीय संविधान स्वीकारण्याच्या ७५ वर्षांच्या स्मरणार्थ विशेष चर्चा
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी व विरोधी पक्षांचे महत्त्वाचे प्रस्ताव, महिला सशक्तीकरणावर चर्चा, तसेच अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त विशेष अधिवेशन यांसह विविध विषय हाताळले जाणार आहेत.