ताज्या बातम्या राष्ट्रीय

न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर आणि इंडियन कॉन्सुलेटमध्ये जिजाऊ वंदना आणि शिवपाळणा गूंजला

By डॉ संगीता तोडमल

न्यूयॉर्क – डॉ. संगीता तोडमल इंगुळकर आणि निलेश इंगोळकर यांनी न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअर आणि इंडियन कॉन्सुलेटमध्ये जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात केली आणि शिवछत्रपती महाराजांचा पाळणा गात ऐतिहासिक क्षण साजरा केला.

३९५व्या शिवजयंती महोत्सवाचे आयोजन इंडियन कॉन्सुलेट आणि छत्रपती फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. यावेळी छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक, उद्योगपती स्वप्नील खेडेकर यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. अमेरिकेसारख्या ठिकाणी अनेक शिवप्रेमींना एकत्र आणून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कार्याचा जागर साता समुद्रापार पोहोचवणे, ही फाउंडेशनच्या कार्याची विशेष बाब असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

भारताच्या न्यूयॉर्क कॉन्सुलेटमधील राजदूत बिनाय प्रधान यांच्या हस्ते शिवछत्रपती महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र सरकारचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा भेट देऊन छत्रपती फाउंडेशनच्या कार्याचा गौरव केला. जगजित निंबाळकर आणि वरद ओझरकर यांनी त्यांचे प्रतिनिधित्व केले.

परिसंवादात अपार दळवी यांनी छत्रपती फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करत न्यूयॉर्क शहरातील एखाद्या रस्त्याला शिवछत्रपतींचे नाव देण्यात यावे, तसेच अमेरिकेतील शिकागो, अटलांटा, सेंट फ्रान्सिससारख्या शहरांमध्ये अधिकृत शिवजयंती साजरी करण्यासाठी कॉन्सुलेटने परवानगी द्यावी, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मल्लिका पाटील यांनी केले, तर बिझनेस समिटमध्ये ईशा धुमाळ यांनी मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या. या समिटमध्ये विनोद झेंडे, विजय सूर्यवंशी, दिलीप चव्हाण यांचा सहभाग होता.

रुद्र डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी नृत्य सादर केले, तर न्यू जर्सीतील सपना परिख, मीनल सप्रे, नियती अग्रवाल, चेतना तलवारे, शितल चौरीकर, नेहा ईटाई, शहेला गोस्वामी, साईली जगधने-घावटे यांनी “विठ्ठल विठ्ठल” गाण्यावर लेझीम नृत्य सादर केले.

अटलांटामधून आलेल्या सुनिल इंगुळकर आणि नीलिका इंगुळकर या चिमुकल्यांनीही नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.

एआय (AI) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अभिषेक सूर्यवंशी आणि एनएसओ कंपनीतर्फे एक पोर्टल विकसित करण्यात आले असून जगभरातील ३०० भाषांमध्ये शिवरायांबद्दल माहिती पोहोचेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला न्यूयॉर्क सिटीचे डेप्युटी कमिशनर दिलीप चव्हाण, असेंब्ली वुमन जेनिफर राजकुमार, तसेच आयएनआय सॉफ्टवेअरचे संस्थापक आणि सीईओ श्याम कुमार उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणातून शिवरायांचे कार्य आणि त्यांची प्रेरणा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याच्या गरजेवर भर दिला

शिवरायांचे विचार आणि कार्य जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी न्यूयॉर्कमधील छत्रपती फाउंडेशन आणि भारतीय वाणिज्य दूतावासाने आयोजित केलेला हा सोहळा ऐतिहासिक ठरला. सांस्कृतिक, व्यावसायिक आणि ऐतिहासिक दृष्टीने हा उपक्रम शिवप्रेमींसाठी अभिमानास्पद ठरला.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे