ताज्या बातम्या महाराष्ट्र

जातवैधता प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना सहा महिन्यांची मुदत; व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाबाबत राज्य सरकारचा मोठा दिलासा

Officials participate in a review meeting at Dr. Homi Bhabha State University (HBSU), Mumbai, chaired by the Vice-Chancellor.

मुंबई: सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. यामुळे प्रवेश प्रक्रियेदरम्यान जातवैधता प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही माहिती देताना सांगितले की, राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (SEBC) तसेच इतर मागास प्रवर्ग (OBC) प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे काही विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र वेळेत मिळू शकले नाही.

ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने विद्यार्थ्यांना अर्जाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

The Vice-Chancellor addresses officials during a review meeting at Dr. Homi Bhabha State University (HBSU), Mumbai.

सरकारने स्पष्ट केले आहे की, निर्धारित सहा महिन्यांच्या मुदतीत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. मुदतीत प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यावर राहील.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केले की, ही सहा महिन्यांची मुदत अंतिम संधी असून यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही.

यासंदर्भातील शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे.

Rajkaran Bureau

About Author

1 Comment

  1. Craig Melbourne

    July 2, 2026

    Hi there! I’m at work surfing around your blog from my new iphone! Just wanted to say I love reading through your blog and look forward to all your posts! Keep up the great work!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात