मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड-किल्ल्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली पॅरिसला दाखल झाले आहे.
आज वर्ल्ड हेरिटेज कमिटीचे सदस्य आणि युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे या गड-किल्ल्यांचे नामांकन युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये झाले आहे, अशी माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली.
शिष्टमंडळाने यासंबंधी पुढील टप्प्यातील तयारी आणि सादरीकरणावर चर्चा केली. या बैठकीत अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन उपस्थित होत्या.