पुण्याच्या रुग्णाला पाच लाखांची मदत
X: @NalawadeAnant
मुंबई : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवर केली.
पुणे येथील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना पाच लाखाची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून देण्याचे निर्देश त्यांनी विभागांच्या संबंधितांना फाईलवर दिले. काही दिवसांपूर्वी पुणे स्थित चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य देण्याची विनंती केली होती.
पण राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. त्यातच सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत असले तरी त्यांनी निकाल आल्या आल्या सलग तीन दिवस आपल्या गावी जाणे पसंद केले. त्यानंतर ते मुंबईत आल्यावर मुख्यमंत्री कोण यावर दावे प्रतिदावे. अशात महायुतीला निवडणूकीत राज्यातल्या जनतेने तब्बल २०० पार जागा दिलेल्या असतानाही मुख्यमंत्री पदाचा सस्पेंस काही संपत न्हवता.अशात आज सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजप चें नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. व फडणवीस यांनी मंत्रालयातील ६ व्या मजल्यावरील आपल्या दालनाचा ताबा घेतला. आणि लगोलग एका चांगल्या फाईल वर सही करतं तात्काळ शुभारंभ केला