भोपाळ
मोहन यादव यांची मध्य प्रदेशच्या नवे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे अखेर मध्य प्रदेशला त्यांचा नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. मात्र मोहन यादव राज्याच्या मुख्यमंत्रिपदी निवडून येतील याचा अंदाज क्वचितच कोणी बांधला असेल. आता लोक त्यांच्याबाबत जाणून घेत आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याबाबत एक वित्तीय बातमी समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांवर कोट्यवधींचं कर्ज
निवडणूक आयोगात दाखल प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार, मोहन यादव यांच्यावर तब्बल 9 कोटींचं कर्ज आहे. प्रतिज्ञापत्रात यावर स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे.
मोहन यादवांवर किती आहे कर्ज?
मोहन यादवांवर एकूण 8,54,50,844 रुपयांचं कर्ज आहे. हे कर्ज विविध आर्थिक संस्था आणि अन्य माध्यमांकडून घेतलं आहे. myneta.com नुसार मोहन यादव यांची एकूण संपत्ती 42 कोटींची आहे. आणि त्यांच्यावर 8.5 कोटींचं कर्ज आहे. राज्यातील काही निवडक श्रीमंत नेत्यांमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं जातं. 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त संपत्ती घोषित करणाऱ्या नेत्यांच्या टॉप ३ यादीच मोहन यादव यांचं नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

किती आहे नेटवर्थ
आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोहन यादव यांच्याकडून निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत सांगायचं झालं तर त्यांच्या कुटुंबाचं नेटवर्थ 42,04,81,763 कोटी रुपये आहे आणि यापैकी मोहन यादव यांच्याकडे 1.41 लाख रुपये कॅश आणि पत्नी सीमा यादव यांच्याकडे 3.38 लाख रुपये कॅश आहे. तर अनेक बँक अकाऊंटमध्ये यादव आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर 28,68,044.97 रुपये जमा आहेत.