महाराष्ट्र ताज्या बातम्या

नागपूर जिल्ह्यात फर्टिलायझर कॉम्प्लेक्सच्या उभारणीबाबत मुख्यमंत्री सकारात्मक – आमदार डॉ. आशिष देशमुख

’गेल’ने दाखवले स्वारस्य; शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

मुंबई : नागपूर जिल्ह्यात इंटिग्रेटेड फर्टिलायझर कॉम्प्लेक्स उभारण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेली चर्चा सकारात्मक झाली आहे, अशी माहिती सावनेर–कळमेश्वरचे आमदार डॉ. आशिषराव देशमुख यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 10 एप्रिल रोजी मुंबई येथे भेट घेऊन या महत्वाकांक्षी प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली. ओडिशा राज्यात जाणारी नैसर्गिक वायूची पाइपलाइन नागपूरमार्गे जात असल्याने या गॅसच्या पुरवठ्यावर आधारित केमिकल रिफायनरी कॉम्प्लेक्स तसेच खत प्रकल्प उभारण्यास मोठी संधी आहे, असे डॉ. देशमुख यांनी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

डॉ. देशमुख म्हणाले, “या प्रकल्पातून युरिया व शेतीसाठी आवश्यक रसायने स्थानिक पातळीवर उत्पादनात आणता येतील, ज्यामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात खते मिळून त्यांचे आर्थिक शोषण थांबेल. नागपूरसारख्या जिल्ह्यात अशा प्रकल्पाची स्थापना झाल्यास प्रादेशिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, शेतीचे उत्पादन वाढेल आणि रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील.”

गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (गेल) ने या प्रकल्पात रस दाखवला असून, केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

या बैठकीस उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी. अंबालागन, गेलचे जनरल मॅनेजर आनंद कापरे, बिडीचे डायरेक्टर राजीव सिंघल, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रवीणकुमार श्रीवास्तव हे मान्यवर उपस्थित होते. प्रकल्पाशी संबंधित सविस्तर निवेदन मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करण्यात आले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनीही प्रकल्पाच्या आवश्यक प्रक्रियांना गती देण्याचे आश्वासन दिले असून, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही दिल्या.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात