मुंबई – मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे काम उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात बंद झाले होते, असा भाजप नेते राम कदम यांनी केलेला दावा चुकीचा आहे, असा खुलासा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केला आहे. सदर कक्ष अखंडित सुरू होता आणि ठाकरे सरकारने त्याचा विस्तार केला होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
RTI माहितीप्रमाणे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांत या निधीत ७९३ कोटींची वाढ करण्यात आली. तुलनात्मकदृष्ट्या, देवेंद्र फडणवीस यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात ६१४ कोटींची वाढ, तर एकनाथ शिंदे यांच्या एका वर्षाच्या कार्यकाळात ६५ कोटींची वाढ झाली आहे.
कोविड काळात मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत देण्यात आली, असा दावाही ठाकरे गटाने केला. उपलब्ध आकडेवारीनुसार, फडणवीस सरकारच्या काळात १,०७,७८२ अर्जांपैकी ६३,५७३ नागरिकांना ५९८ कोटींची मदत मिळाली, तर उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात १०,७१२ अर्जांपैकी ४,२४७ नागरिकांना २०.२८ कोटींची मदत करण्यात आली.
या आकडेवारीवरून ठाकरे सरकारने मुख्यमंत्री सहायता कक्ष बंद केला नव्हता, उलट निधी वाढवून मदत कार्य पुढे नेल्याचे स्पष्ट होते, असा दावा उद्धव सेना करत आहे.