ताज्या बातम्या राष्ट्रीय

‘भाजपचा नारा, बेटी रुलाओ, बेटी सताओ और बेटियों को घर बिठाओ’; काँग्रेस आक्रमक

नवी दिल्ली

ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपट्टू साक्षी मलिक हिने संतापाच्या भरात निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विरोधी पक्षांनी भाजपला घेराव घातला आहे. गुरुवारी साक्षी मलिकच्या निवृत्तीच्या (Olympic champion Sakshi Malik Retirement) घोषणेनंतर विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मोदी सरकारविरोधात आपला राग व्यक्त केला.

आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला. कुस्तीपट्टू महिला खेळाडूंवरील लैंगिक शोषणाचे आरोपी भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचे सहकारी संजय सिंह निवडणूक जिंकल्यानंतर ऑलिम्पिक पदक विजेती महिला कुस्तीपट्टू साश्री मलिकने निवृत्ती घेणं भारताच्या क्रीडा क्षेत्राच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे. शेतकऱ्याच्या लेकीच्या डोळ्यातून निघणारा प्रत्येक अश्रू मोदी सरकारच्या निर्लज्जपणाचा पुरावा आहे. भाजपचा नारा हा… ‘‘बेटी रुलाओ, बेटी सताओ और बेटियों को घर बिठाओ’’ असा आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी संताप व्यक्त केला.

साक्षी मलिकची निवृत्ती
कुस्तीपट्टू साक्षी मलिक यांनी गुरुवारी (21 डिसेंबर) कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली. त्या म्हणाल्या की, जर बृजभूषण शरण सिंह सारखे लोक महासंघात असतील तर त्या कुस्ती सोडण्याचा निर्णय घेत आहेत. माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात साक्षी मलिक यांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. ज्यावरुन साक्षी मलिक यांच्यासह बजरंग पुनिया, विनेश फोगाट सारखे अनेक कुस्तीपट्टूंनी दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन पुकारलं होतं.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

राष्ट्रीय

स्वातंत्र्य दिन राजधानीत उत्साहात साजरा

Twitter : @therajkaran नवी दिल्ली 76 वा स्वातंत्र्य दिन राजधानी दिल्लीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी उभय महाराष्ट्र सदनांमध्ये
राष्ट्रीय

लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा कुठे तयार होतो?

Twitter : @therajkaran मुंबई राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर मोठ्या गौरवाने फडकणारा तिरंगा कुठे तयार केला जातो हे तुम्हाला माहिती आहे