महाराष्ट्र ताज्या बातम्या

काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती देणाऱ्या भाजपावर तात्काळ कारवाई करून एफआयआर दाखल करा : कांग्रेस

मुंबई: काँग्रेस पक्षाने कर्नाटक,तेलंगणा विधानसभेवेळी दिलेल्या गॅरंटींची अंमलबजावणी केली जात नाही अशा पद्धतीच्या खोट्या व जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती भाजपने विविध वर्तमानपत्रात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केल्या असल्या तरी वास्तविक पाहता काँग्रेसने कर्नाटक व तेलंगणा राज्यात गॅरंटी लागू केलेल्या आहेत.असे असतानाही भाजपाने जाणीवपूर्वक काँग्रेसविरोधात अपप्रचार केल्याने भाजपावर तात्काळ कारवाई करून त्यांच्यावर एफआयआरही दाखल करावा,अशी मागणी केल्याचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी गुरूवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-याची भेट घेऊन भाजपा विरोधात लेखी तक्रार केली.यावेळी पवन खेरा यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे,सचिन सावंत, चरणजित सप्रा,विधी विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड रवी जाधव आदी उपस्थित होते.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बोलताना खेरा म्हणाले की, महाराष्ट्रातील प्रमुख वर्तमानपत्रात पहिल्या पानावर भाजपाने काँग्रेसविरोधात खोट्या जाहिराती प्रसिद्ध करत पक्षाने गॅरंटी लागू केल्या नाहीत असा अपप्रचार करण्यात आला आहे.त्यामुळे निवडणूक आयोग काँग्रेसच्या तक्रारीची दखल घेऊन भाजपावर तात्काळ कारवाई करेल अशी अपेक्षाही खेरा यांनी व्यक्त केला.

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत १३३ कट्टरपंथीय संघटना होत्या या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपाला उत्तर देताना अतुल लोंढे म्हणाले की, निवडणुकीत पराभव होत असल्याचे दिसू लागतात असे अहवाल बाहेर काढले जातात.जसे लोकसभा निवडणुकीच्या वेळीही पंतप्रधानांना मारण्याची धमकी आल्याचे सांगितले होते.पण तो मेल हॅक करून पाठवण्यात आल्याचे नंतर उघड झाले.त्यामुळे भाजपाला पराभव दिसू लागला असून आपण स्वतः निवडणूक हरत असल्याचे दिसत असल्यानेच मानसिक संतुलन बिघडले असावे.त्यातूनच काल राहुल गांधींबद्दल शहर नक्षलवाद्यांचे विधान केल्यानंतर हा अहवाल पुढे केला जात आहे, असा थेट आरोपही लोंढे यांनी केला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात