मुंबई
काँग्रेस पक्षाला 28 डिसेंबर रोजी 138 वर्ष पूर्ण होतील. यानिमित्ताने काँग्रेसकडून नागपूरमध्ये मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पक्षाने या कार्यक्रमासाठी ‘आम्ही तयार आहोत’ अशी घोषणा केली आहे.
28 डिसेंबर रोजी नागपूर येथे काँग्रेस स्थापना दिवस साजरा (Congress Foundation Day at Nagpur on 28th December) केला जाणार आहे. यासाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे. या कार्यक्रमात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधीसह काँग्रेसचे कार्यसमितीचे सर्व नेते आणि काँग्रेस शासित राज्यातील मुख्यमंत्रीदेखील सहभागी होतील. याशिवाय मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशोक चव्हाणांनीही यावेळी नागपूरमधील कार्यक्रमाचा पाहणी दौरा केला.
7 ते 8 लाख कार्यकर्ते होणार दाखल
नागपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेस स्थापना दिवसाची तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांसह 7 ते 8 कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्षाकडून ‘आम्ही तयार आहोत’ अशी घोषणा तयार करण्यात आली आहे. कार्यक्रमाचं आयोजन नागपूर पूर्वेत करण्यात आलं आहे.
हे विचारधारेच युद्ध
नागपूरमध्ये आयोजित काँग्रेसच्या स्थापना दिवसाबाबत माहिती देताना महाराष्ट्र काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ही लढाई विचारधारेची आहे. जी नागपूरहून सुरू झाली. यासाठी काँग्रेस नागपूरमध्ये स्थापना दिवसाचं आयोजन करण्यात आलं आहे.
1885 मध्ये काँग्रेसची स्थापना
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर रोजी मुंबईच्या गोकुळ दास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात झाली होती. यावेळी काँग्रेसचे ७२ प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी पक्षाचे संस्थापक महासचिव एओ ह्यूम होते. पहिल्या स्थापना दिवशी एओ ह्यूमने पक्षाच पहिला अध्यक्ष कलकत्ताचे व्योमेश चंद्र बॅनर्जी यांची निवड केली होती.