नवी दिल्ली
देशात अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचे तयारी मोठ्या दणक्यात सुरू आहे. यादरम्यान काँग्रेस नेता सॅम पित्रोदा यांनी मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. राम मंदिर हा खरा मुद्दा आहे का ? ते म्हणाले की, राम मंदिरापेक्षा शिक्षण, रोजगार, अर्थव्यवस्था, महागाई, आरोग्याचा खरा मुद्दा आहे. या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी. सॅम पित्रोदा इंडियन ओव्हरसीज काँग्रसचे अध्यक्ष आहेत. त्यांचे गांधी कुटुंबाशी जवळचे संबंध आहेत. त्यांनी एका मुलाखतीदरम्यान हे वक्तव्य केलं.
सॅम पित्रोदा पुढे म्हणाले की, मला कोणत्याही धर्मापासून काही अडचण नाही. कधी कधी मंदिरात दर्शनासाठी जाणं ठीक आहे. मात्र तुम्ही त्याला मुख्य ठिकाण बनवू शकत नाही. ४० टक्के लोक भाजपला मतदान करीत नाहीत. नरेंद्र मोदी देशातील नागरिकांचे पंतप्रधान आहेत. ते कोणा पक्षाचे पंतप्रधान नाहीत, हेच भारतीयांना पंतप्रधानांकडून अपेक्षित आहे.
जनता ठरवेल महत्त्वाचे मुद्दे…
पित्रोदा पुढे म्हणाले की, तुम्ही बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोला… महागाईवर बोला.. विज्ञान आणि तंत्रज्ञान… यातील आव्हानांविषयी बोला.. जनता ठरवेल की खरा मुद्दा कोणता… राम मंदिर खरा मुद्दा आहे की, बेरोजगारी.. राम मंदिर खरा मुद्दा आहे की, दिल्लीतील वायू प्रदूषण?