मुंबई : राज्य सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करतानाच यातून काही कौशल्य विकास करणारे अभ्यासक्रम सुरु करुन तरुणांना रोजगाराच्या नाविन्यपूर्ण संधी उपलब्ध करून कशा देता येतील याचा कृती आराखडा तयार करा, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी दिल्या.
राज्याचे नवे सांस्कृतिक धोरण तयार झाले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. आज या समितीची बैठक मंत्रालयात मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
मागील सरकारच्या कार्यकाळात धोरण निर्मितीस योगदान दिलेले सदस्य आणि नव्या अंमलबजावणी समितीच्या सदस्यांसोबत ही बैठक घेतली. राज्याच्या सांस्कृतिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा केली व उपाययोजना अधोरेखित यावेळी केल्या गेल्या.
यावेळी पद्मश्री माननीय श्री. गिरीष प्रभुणे, संगीतकार श्री. कौशल इनामदार, श्रीमती अनिता यलमटे, आचार्य शाहीर हेमंतराजे पु. मावळे, श्री. सुनील दादोजी भंडगे, गायक श्री. लेखक श्री. अभिराम भडकमकर, श्री. शितूदादा म्हसे, पत्रकार श्री. राजेश प्रभु साळगावकर, श्री. जगन्नाथ कृष्णा दिलीप, दर्शनिका विभाग कार्यकारी संपादक व सचिव. डॉ. दिलीप प्र. बलसेकर, सांस्कृतिक संचालक विभीषण चवरे, पुराभिलेख संचालनालय संचालक सुजितकुमार उगले, साहीत्य अकादमी सहसंचालक. सचिन निंबाळकर, रंगभूमी परिनिरीक्षण सचिव श्री. संतोष खामकर, उपस्थित होते.