केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या व्यक्तव्यावरून संभ्रम
Twitter : @therajkaran
मुंबई
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखला मिळावा ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरसकट विचार करण्यापेक्षा घटनेतील तरतुदीनुसार सामाजिक, शैक्षणिक आर्थिक मागास यांचा सर्व्हे व्हावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे हे केंद्रात मंत्री असल्याने मराठा आरक्षण आणि मारठ्यान कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतची त्यांची भूमिका ही केंद्र सरकारची भूमिका आहे, असे समजण्यात येत आहे.
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत संगीतले की, याआधी राज्यात विविध समाजाला जी आरक्षणे देण्यात आली तेव्हा खुर्चीवर मराठा मुख्यमंत्रीच होते. मराठ्यांनी देताना कधीच कोणाचा द्वेष केला नाही. त्यामुळे आता मराठ्यांना देताना इतर कोणत्या जातीत द्वेषाची भावना असू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मराठ्यांना आरक्षण देताना इतर कोणत्याही जातीचे आरक्षण काढून घेऊ नये, अशी माझी आधीही भूमिका होती व यापुढेही राहील, असेही नारायण राणे म्हणाले.
भाजपा प्रदेश कार्यालयातील या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी त्यांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका विषद केली. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्याबददल समाधान व्यक्त करताना नारायण राणे म्हणाले, राज्यात ३८ टक्के मराठा समाज आहे. आर्थिक स्थितीमुळे शैक्षणिक पात्रता मिळविता आली नाही, अशा मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी अनेक वर्षे जुनी आहे. त्यांना १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर तो सध्या रद्द आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. पण असे सरसकट कुणबी म्हणून आरक्षण देण्यात येवू नये.
राणे म्हणाले, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागास या निकषांवर आरक्षण द्यावे अशी मागणी आहे. सरसकट कुणबी दाखला द्यावा ही ९६ कुळी मराठ्यांची मागणी नाही. सरसकट देण्याचा विचार करण्यापेक्षा सर्वेक्षण करावे. जे गरीब आहेत, शैक्षणिक पात्रता ज्यांना मिळवता आली नाही, आर्थिक स्थितीमुळे अशा मराठा समाजाला आरक्षण द्यावे. इतर कोणत्याही जातीचे आरक्षण काढून मराठा समाजाला द्यावे, असेही होता कामा नये, याची काळजी मी आधीही घेतली होती. मराठा समाज आरक्षण मागत असताना यापुर्वी विविध जातींना आरक्षणे देण्यात आली, तेव्हा मुख्यमंत्रीपदी मराठाच होते. मराठ्यांनी देताना कोणाचा द्वेष केला नाही, आता मराठ्यांना देताना इतर कोणाचीही द्वेषाची भावना असू नये, असे मला वाटते असेही नारायण राणे म्हणाले.