Twitter : @vivekbhavsar
मुंबई
महाराष्ट्रात आजच्या घडीला सर्वाधिक चर्चेत असलेले एकमेव नेते म्हणजे अजित पवार. अजित दादा बैठकीला गैरहजर असले किंवा पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत दिसले नाहीत तर अजित पवार नाराज असल्याची चर्चा सुरू होते. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीला अजित पवार उपस्थित नसल्याने (Ajit Pawar was absent from the cabinet meeting) ते सरकारवर नाराज आहेत, आशा चर्चा सुरू झाल्या. मात्र, घशात तीव्र संसर्गामुळे ते आज अनुपस्थित होते, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. अजित दादा यांच्या कुटुंबात वावर असलेल्या त्यांच्या विश्वासू व्यक्तीने या महितील दुजोरा दिला.
या माहितगाराने सांगितले की, अजित पवार गेले तीन दिवस सतत फिरत असून बैठक घेत आहेत. सततचे बोलणे, धुळीत फिरणे यामुळे अजित दादा यांच्या घशाला तीव्र संसर्ग झाला. काल (सोमवारी) बारामतीमध्ये (Baramati) त्यांनी पहाटे ६.३० वाजता अधिकाऱ्यांकडून सादरीकरण घेतले, त्यानंतर लहान मुलांच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले, तेव्हाच त्यांना बोलण्याचा त्रास जाणवत होता.
या कौटुंबिक स्नेहयाने सांगितले की, बारामतीमध्ये सकाळी ७ वाजता एका परिचिताने त्यांना चहासाठी बोलावले. तिथे दादांनी दमदार नाश्ता केला. दिवसभर बारामतीमधील बैठक आणि भेटीगाठी संपल्यावर ते मुंबईकडे निघाले. सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी दुपारी जेवण घेण्यास सांगितले, मात्र त्यांनी सकाळी नाश्ता केल्यानंतर दुपारी काहीही खाल्ले नाही. रात्रीही केवळ सूप घेऊन त्यांनी आराम केला.
आज मंगळवारी घशाला खूप त्रास असल्याने दादांनी बंगल्यावर आराम करणे पसंद केले. आता त्यांना आराम आहे आणि उद्याचा (बुधवार) चा कार्यक्रम तयार झाला असून सकाळी ८ वाजता शासकीय बंगल्यावर अभ्यागतांच्या भटीगाठी आणि नंतर शासकीय बैठकांना उपस्थित असतील.