Twitter : @therajkaran
नवी दिल्ली
फेब्रुवारीमध्ये सादर होणारा अर्थसंकल्प व्होट ऑन अकाउंट असेल. म्हणजेच यामध्ये कोणत्याही मोठ्या घोषणा होणार नाहीत. निवडणुकीचे वर्ष असल्याने अंतरिम अर्थसंकल्प (Interim Budget 2024) सादर करावा लागेल पण, आता स्वत: अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात कोणतीही मोठी घोषणा होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
हा केवळ वोट-ऑन अकाऊंट (Vote on Account) अर्थसंकल्प असेल. लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha elections 2024) आणि नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल. तोपर्यंत मोठ्या घोषणेची वाट पाहावी लागणार आहे.
अर्थसंकल्पात मोठी घोषणा नसेल
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी २०२४ रोजी त्या अर्थसंकल्प सादर करतील. मात्र हा अर्थसंकल्प वोट ऑन अकाऊंट असेल. यात मोठी घोषणा होण्याची शक्यता कमी असेल. मोठ्या घोषणेसाठी लोकसभा निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. निर्मला सीतारामन यांनी आज उद्योग चेंबर CII च्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
येथे त्यांनी पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पाबाबत मोठी बाब व्यक्त केली. पुढील अर्थसंकल्पात आयात कराबाबत (import duty) मोठा बदल होण्याची शक्यता कमीच असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर नवं सरकार स्थापन होईल आणि त्यानंतर जून-जुलै या महिन्यात संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाईल.